जलजिवन मिशन योजनेअंतर्गत 12 योजनांना 12 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नामुळे 12 गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार.Satara News Team
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
- बातमी शेयर करा
दौलतनगर : पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेल्या गावातील नळ पाणी पुरवठा योजना हया कालबाहय तसेच जिर्ण झाल्याने या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत होती.विशेषत: या गावांमध्ये उन्हाळयात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे या गावांतील ग्रामस्थांनी नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होण्यासाठी मागणी केली होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या या गावांचा जलजिवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश करत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे शिफारशीही केल्या होत्या. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री यांचेकडे केलेल्या सातत्याचे पाठपुराव्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील 12 गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत 12 कोटी 25 लक्ष 53 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत सध्या गावा-गावांमध्ये नविन नळ पाणी पुरवठा योजनांची कामे मंजूर करण्यात येत असून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पालकंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मोठया प्रमाणांत नळ पाणी पुरवठा मंजूर करुन त्यांस निधी मंजूर करण्यात आला असून या योजनांची कामे सध्या गावो-गावी प्रगती पथावर आहेत.दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघातील बेलदरे, म्होप्रे, गिरेवाडी, आडदेव,साबळेवाडी,वाडीकोतावडे,खळे,नवसरवाडी,नाडोली,माजगाव,वेताळवाडी व त्रिपुडी या गावांमध्ये नवीन नळ पाणी पुरवठा योजना होण्यासाठी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे विनंती केली होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या गावांचा तातडीने जलजिवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश करत या गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना निधी मंजूर होण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील 12 गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना राज्य शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत 12 कोटी 25 लक्ष 53 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांमध्ये बेलदरे 45.15 लाख, म्होप्रे 177.41 लाख, गिरेवाडी 82.04 लाख, आडदेव बु व आडदेव खुर्द 188.65 लाख, साबळेवाडी 86.37 लाख,वाडीकोतावडे 53.83 लाख,खळे 98.77 लाख,नवसरवाडी 89.91 लाख ,नाडोली 80.48 लाख,माजगाव 115.14 लाख,वेताळवाडी 120.75 लाख व त्रिपुडी 87.13 लाख या योजनांचा समावेश असून मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या निविदा प्रक्रिया कार्यवाही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सुरु केली आहे.निविदा निश्चित झाल्यानंतर जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Sat 26th Aug 2023 06:19 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sat 26th Aug 2023 06:19 pm












