अवघ्या 1 सेमी आकारात साकारली श्रीकृष्णाची कलाकृती
Satara News Team
- Thu 18th Aug 2022 09:38 am
- बातमी शेयर करा
तळमावले/वार्ताहर : गुरुवार दि.18 रोजीच्या गोकुळअष्टमीचे औचित्य साधत पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी अवघ्या 1 बाय 1 सेमी एवढया लहान चैकोनात श्री कृष्णाची कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती साकारत डाॅ.डाकवे यांनी सर्वांना गोकुळअष्टमीच्या अनोख्या चित्रमय शुभेच्छा दिल्या आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी 83 चित्रे रेखाटून वाढदिवसाच्या शुभेच्छा, मोरपीस-जाळीदार पिंपळपानावर कलाकृती, बोलक्या भिंती रेखाटन, घराच्या भिंतीवर वारीचे आणि जवानांचे चित्र, कॅलिग्राफीतून जवानांना सलाम, अक्षरातून विठ्ठलाच्या चित्रांची निर्मिती, शब्दातून चित्र निर्मिती, वारीचे पोस्टर, 11 हजार चित्रे भेट, प्रतिबिंब भित्तीपत्रिका प्रकाशन, लता मंगेशकर यांचे वाद्यातून चित्र, शरद पवार यांना 81 पत्रे, अक्षर अभंग वारी लेखन, स्क्रिबलिंग-ठिपके चित्र, कॅबिनेट मंत्री ना.शंभूराज देसाई यांची 54 चित्रे, पेपर कटींग आर्ट, कर्मवीर भाऊराव पाटील यांना 133 शब्दांत मानवंदना, बाळशास्त्री जांभेकर यांची विविध चित्रे, कात्रण प्रदर्शन, छत्री-कागद-मास्क यावर व्यसनमुक्ती संदेश, हस्तलिखिते, रांगोळी, अक्षरगणेशा उपक्रम असे विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत.
कलेच्या माध्यमातून डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत 5 रेकाॅर्ड केले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड, वल्र्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकात एकदा त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून त्यांना 4 पुरस्कारांनी तर विविध सामाजिक संस्थांनी त्यांना 55 पेक्षा जास्त पुरस्कार प्रदान केले आहेत. याशिवाय स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी 100 पेक्षा जास्त सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत.
कलेतून सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे प्रयोग करत असलेल्या डाॅ.डाकवे यांनी अतिशय लहान आकारात रेखाटलेल्या श्री कृष्णाच्या चित्राची परिसरात प्रशंसा होत आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 18th Aug 2022 09:38 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 18th Aug 2022 09:38 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 18th Aug 2022 09:38 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 18th Aug 2022 09:38 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Thu 18th Aug 2022 09:38 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Thu 18th Aug 2022 09:38 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 18th Aug 2022 09:38 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Thu 18th Aug 2022 09:38 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Thu 18th Aug 2022 09:38 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 18th Aug 2022 09:38 am









