सत्तेत गेल्यावर काहींची चाैकशीच बंद झाली; शरद पवारांचा अजित पवारांना टोला
Satara News Team
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
- बातमी शेयर करा
काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो, असे सांगत आहेत. मात्र, हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे. संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्षाला काही महत्त्व असते की नाही? अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलचा मेळावा रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. अगोदर लोकांना ‘ईडी’ हा शब्द माहीत नव्हता. आता ‘ईडी’ हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. ईडीचा गैरवापर फार झाला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दोन वेळा चिन्ह गेले
बैलजोडीवर मी पहिली निवडणूक लढलो. दोनवेळा आमचे चिन्ह गेले आहे. चिन्ह मर्यादित काळासाठी उपयुक्त असते, असे सांगत शरद पवारांनी निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया दिली.
भावनिक आवाहन करण्याचे कारण नाही
मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही, हे मी यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये भावनिक आवाहन करण्याचे कारण नाही. बारामतीचे लोक शहाणे आणि समंजस आहेत. वर्षानुवर्षे कोणी काम केले आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली, हे बारामतीकरांनी पाहिले आहे. ते योग्य निर्णय घेतील, अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.
चिन्हाबाबतचा प्रस्ताव पाठविणार
राष्ट्रवादी काँग्रेस ‘वटवृक्ष’ याच चिन्हाची मागणी आयोगाकडे करणार का? या प्रश्नावर पवार म्हणाले, अद्याप चिन्हाबाबत निर्णय घेतलेला नाही.
निवडणूक आयोगाने चिन्ह कळविण्याबाबत आम्हाला पत्र पाठवले आहे. आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी त्यांची वेळ घेऊ आणि प्रस्ताव देऊ. तत्पूर्वी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून चिन्हाबाबत निर्णय घेणार आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Mon 12th Feb 2024 04:03 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Mon 12th Feb 2024 04:03 pm












