सातारा : खेळ राज्यकर्त्यांचा अन् दमछाक प्रशासनाची
विजय माने - Mon 8th Aug 2022 07:24 am
- बातमी शेयर करा
सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित होऊनही पुन्हा निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निवडणुकांच्या प्रक्रियेत आतापर्यंत दोनदा बदल केले आहेत. निवडणूक प्रक्रियेचे काम पूर्ण झाले असताना आता पुन्हा ही सर्व प्रक्रिया नव्याने राबविली जाणार असल्याने प्रशासनाची दमछाक झाली आहे. आगामी काळात कोणते निर्णय जाहीर होतात आणि निवडणुकीसाठीच्या प्रक्रिया आणखी कितीदा बदलावी लागणार? याची चिंता प्रशासनाला आहे.कोरोनाचे संकट, ओबीसी आरक्षणाला स्थगिती आदी कारणांमुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे २० मार्चपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप रचनेत बदल करून गटांची संख्या वाढविली. ही प्रक्रिया राबविताना प्रशासनानेही कंबर कसली होती. याचबरोबर महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांचीही प्रक्रिया सुरू केली होती.परंतु, महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गट व भाजपच्या सरकारने निवडणुकांच्या प्रक्रियेत बदल करून २०१७ प्रमाणेच निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगित करण्यात आल्या. महापालिका निवडणुकीच्याही प्रभागरचनेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणुकांसाठी पुन्हा आरक्षण सोडत होणार असल्याने प्रशासनाची दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे.
#satarazpelection
#panchayatsamitielection
#satara
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 8th Aug 2022 07:24 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 8th Aug 2022 07:24 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 8th Aug 2022 07:24 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 8th Aug 2022 07:24 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 8th Aug 2022 07:24 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Mon 8th Aug 2022 07:24 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 8th Aug 2022 07:24 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Mon 8th Aug 2022 07:24 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Mon 8th Aug 2022 07:24 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Mon 8th Aug 2022 07:24 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Mon 8th Aug 2022 07:24 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Mon 8th Aug 2022 07:24 am












