‘मविआ’ ला मोठा धक्का विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर;
Satara News Team
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
- बातमी शेयर करा
राहुल नार्वेकर याना भाजप आणि शिंदे गट यांची एकत्रित मिळून तब्बल 164 मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या राजन साळवी याना फक्त 107 मते मिळाली त्यामुळे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत.
सातारा न्युज/ ओमकार सोनावले : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. विधिमंडळात आज मतदान प्रक्रिया पार पडली असता राहुल नार्वेकर याना भाजप आणि शिंदे गट यांची एकत्रित मिळून तब्बल 164 मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या राजन साळवी याना फक्त 107 मते मिळाली त्यामुळे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत.
मतदानावेळी शिंदे गटाने शिवसेनेच्या व्हीपचे पालन न करता आपली सर्व मते राहुल नार्वेकर यांच्या पारड्यात टाकली.तसेच बहुजन विकास आघाडी आणि मनसेने देखील राहुल नार्वेकर याना मतदान केलं. तर समाजवादी पक्षाने तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेना उमेदवार राजन साळवी यांचा थेट पराभव झाला
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानं विधानमंडळ अध्यक्षपदी सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. विधानसभेत राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सभापती आहेत. महाराष्ट्राच्या इतक्या वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती म्हणून जावई आणि सासरे अशी जोडी पाहायला मिळाली आहे.
rahulnarvekar
vidhansabha
bjp
mhavikas
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Sun 3rd Jul 2022 07:21 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sun 3rd Jul 2022 07:21 am












