राजवाडा बसस्थानकासमोर खड्डेच खड्डे - अपघाताला निमंत्रण; नगरपालिकेचे दुर्लक्ष
Satara News Team
- Thu 23rd May 2024 12:39 pm
- बातमी शेयर करा
सातारा : येथील राजवाडा बसस्थानकासमोर रस्त्याच्या मध्यभागी पडलेले मोठमोठे खड्डे नागरिक व वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून हे पडलेले खड्ड्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. परिणामी याबाबत नागरिक व वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्त्याच्या मध्ये पडलेल्या या खड्ड्यात अनेकदा पावसाचे पाणी साचत असल्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांना ते दिसून येत नाही. त्यामुळे वाहने ही खड्ड्यात आदळत असून अनेक वाहन चालकांचा वाहनावरचा ताबा ढळत आहे. त्यामुळे त्यांना शारीरिक इजा बरोबरच वाहनाची ही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राजवाडा बसस्थानकात ये जा करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांची संख्या मोठी आहे. त्याच्यासाठी हे खड्डे धोकादायक ठरत आहेत.
विशेषता समर्थ मंदिर व मंगळवार तळे कडून येणारे असंख्य वाहनचालकांना हे खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे संबंधित विभागाने हे खड्डे त्वरित मुजवावे, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे . रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण पाहता सुरक्षित प्रवासासाठी उत्तम रस्ते काळाची गरज आहे सातारा शहरात विविध ठिकाणी रस्त्यामध्ये पडलेले खड्डे हे तातङीने मुजविणे आवश्यक आहे.
मनुष्यहानी टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. राजवाडा बसस्थानक( चांदणी चौक) वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते या ठिकाणी सुरक्षिततेच्या कोणत्याच उपाययोजना नाहीत. येथील सिग्नल यंत्रणा ही बंद आहे, त्यातच पडलेल्या खड्ड्याची भर पडली आहे. नागरिक व वाहनचालकांच्या सुरक्षित प्रवासासाठी खड्डेमुक्त शहराचे नियोजन आवश्यक असल्याचे श्रीरंग काटेकर यांनी सांगितले.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 23rd May 2024 12:39 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 23rd May 2024 12:39 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 23rd May 2024 12:39 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 23rd May 2024 12:39 pm
संबंधित बातम्या
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Thu 23rd May 2024 12:39 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Thu 23rd May 2024 12:39 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 23rd May 2024 12:39 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Thu 23rd May 2024 12:39 pm
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Thu 23rd May 2024 12:39 pm
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Thu 23rd May 2024 12:39 pm
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 23rd May 2024 12:39 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Thu 23rd May 2024 12:39 pm













