अरविंद केजरीवाल चौकशी प्रकरणी सातारा ‘आप’चे मौन आंदोलन

सातारा : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने मुद्दाम, त्रास देण्याच्या हेतूने आणि दडपशाही करीत चौकशीसाठी बोलावले. या भ्याड नीतीचा सातारा आम आदमी पक्षाच्यावतीने शहरातील हुतात्मा स्मारक येथे काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.
यावेळी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर, जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र बाचल, रतन पाटील, जिल्हा खजिनदार विजयकुमार धोतमल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती शिंदे, जिल्हा सल्लागार सदस्य एडवोकेट मंगेश महामुलकर, जिल्हा सचिव मारुती जानकर, शहराध्यक्ष जयराज मोरे शहर उपाध्यक्ष सादिक शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची 100 कोटींच्या लाचप्रकरणात आतापर्यंत तीनवेळा सीबीआयने चौकशी केली. तसेच त्यांच्या मालमत्तेवर छापेही मारले. मात्र, त्यामध्ये त्यांना आक्षेपार्ह काहीही सापडलेले नाही. मात्र तरीही केवळ त्रास देण्याच्या भावनेतून सीबीआयने केजरीवाल यांना चौकशीसाठी पाचारण केले. याचा निषेध सातार्‍यातील आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना भोगांवकर म्हणाले, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांना दडपशाही करण्याचे हेतूने व दिल्ली व पंजाब या ठिकाणी आम आदमी सरकारचे माध्यमातून होत असलेले लोकहितकारक कारभाराला घाबरून व केजरीवाल तसेच आम आदमी पार्टीची प्रतिमा मलीन करण्याच्या दुष्ट हेतूने केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून दिल्लीत बसलेल्या केंद्र सरकारने एक भ्याड कृत्य करून सीबीआय मार्फत कपोलकल्पित दारू घोटाळा नामक प्रकरणामध्ये चौकशी करणार असल्याचे भासवून केवळ दडपशाही करण्याच्या हेतुने चौकशी कामी दिनांक 16 रोजी हजर राहण्याचे कळविलेले होते. ही बाब लोकशाही कडून हुकूमशाही कडे जाणारी असल्याची भावना सबंध देशात असल्याने या कारवाईचे निषेधार्थ आम आदमी पार्टी सातारा जिल्ह्याचे वतीने मौन आंदोलन हुतात्मा स्मारक परिसरात करण्यात आले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला