भुईंजमध्ये विवाहितेची आत्महत्या पतीला अटक सासूसह नणंदेचा शोध सुरु
बापू वाघ - Sat 2nd Sep 2023 12:17 pm
- बातमी शेयर करा
भुईंज : भुईंज कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून विवाहितेने विषारी रसायन घेवून आत्महत्या केली आहे.ही घटना गुरुवारी ता ३१ रोजी सायंकाळच्या सुमारास भुईंजमधील चंद्रसेनगर येथे घडली पायल अक्षय वाघ वय २६ असे असे आमहत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेची आई सुवर्णा अविनाश आवारे रा.अजनूज ता.खंडाळा यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती अक्षय संभाजी वाघ यास अटक केली आहे.तर सासू,आशा संभाजी वाघ व नणंद प्रज्ञा अमोल पिसाळ रा.बावधन याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचे लग्न २०१६ सारी झाले होते तेव्हापासून पती,सासू,नणंद हे कौटुंबिक कारणावरून तसेच माहेरचे लोक भिकारी आहेत,तुला स्वयंपाक व घरातील काम येत नाही असे टोचून टोमणे मारत सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होते.ता.३१रोजी साडीच्या कारणावरून घरात वादावादी झाली होती.त्यानंतर घरातील सर्वजण आपापल्या कामाला गेले होते.सायकाळी पती अक्षय आईला आणायला दुचाकी वरून गावात गेला होता.त्यादरम्यान पायाने घरात असलेले पिकावर फवारण्याचे विषारी औषध पिले, दरम्यान तिचा पती सासू घरी आल्यावर ही बाब लक्षात आल्याने पती अक्षयने तिला सातारा येथे उपचारासाठी नेले मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल भंडारे, हवालदार नितिन जाधव, विजय अवघडे, शिवाजी तोडरमल हे करीत आहेत
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 2nd Sep 2023 12:17 pm













