स्वातंत्र्य सैनिकांना आगळे वेगळे अभिवादन सातारच्या गेंडामाळ कब्रस्तानचा स्वातंत्र्यदिनी अभिनव उपक्रम
Satara News Team
- Wed 16th Aug 2023 11:26 am
- बातमी शेयर करा
सातारा - स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सातारा येथे अभिनव पद्धतीने व एक आदर्श असा पायंडा पाडणारे कार्यक्रम घेऊन गेंडा माळ कब्रस्तान ट्रस्टने साजरा केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कारावास भोगलेले व आदर्श असे जीवन जगलेले सातारा शहरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कबरीवर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या वारसांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला. देश प्रेमाची ज्योत अशा पद्धतीने प्रज्वलित ठेवण्याचे काम आज गेंडा माळ कब्रस्तान ट्रस्टींनी केले.
गेंडा माळ कब्रस्तान ट्रस्ट व दारूल उरुल मेहमूदिया मदरसा यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गेंडामाळ कब्रस्थान ट्रस्टचे चेअरमन साजिदभाई शेख ,सादिकभाई शेख ,रफिक शेख ,फारूक शेख ,दारुल उलूम मेहमूदीया चे चेअरमन सलीम कच्ची ,मुहम्मद कलाल,शाकीर बागवान , पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके तसेच स्वातंत्र्य सैनिक उमर पैलवान यांचे वंशज सादिक पैलवान , इस्माईल हकीम यांचे वंशज सत्तार हकीम ,महिताब शेख यांचे वंशज अब्दुलगानी शेख ,बाबूमिया फरास यांचे नातू सिकंदर फरास ,कॉ शेखकाका यांचे चिरंजीव मुन्ना इनामदार हे उपस्थित होते. उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांचा सत्कार व सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मौलाना जमीर ,मुफ्ती मोहसीन ,कारि शाहनवाज यांचीही उपस्थिती होती.
स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रति कृतज्ञ राहुन त्यांच्या विचाराची पाठराखण करणे ही काळाची गरज आहे हे ओळखून यांना गेंडा माळ कब्रस्तान ट्रस्टने स्वातंत्र्य सैनिकांना अभिनव पद्धतीने आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम घेतला हा आगळावेगळा कार्यक्रम असून तो पथदर्शी असा आहे असे विचार विजय मांडके यांनी व्यक्त केले. आणि सातारा शहरातील मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांच्या विषयी थोडक्यात माहिती दिली.
सादिकभाई शेख यांनीही स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिमांच्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली आणि हा वारसा आम्ही जतन करू असा विश्वास उपस्थितांना दिला
सूत्रसंचालन रियाज सर यांनी केले. परिश्रम निसार कच्ची ,अकबर नदाफ यांनी घेतले. आभार नियाज सर यांनी मानले.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Wed 16th Aug 2023 11:26 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Wed 16th Aug 2023 11:26 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Wed 16th Aug 2023 11:26 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Wed 16th Aug 2023 11:26 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Wed 16th Aug 2023 11:26 am
संबंधित बातम्या
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Wed 16th Aug 2023 11:26 am
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Wed 16th Aug 2023 11:26 am
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Wed 16th Aug 2023 11:26 am
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 16th Aug 2023 11:26 am










