छ.शाहु महाराज जनता-जनार्धनासाठी झटणारे अद्वितीय राजे होते : डॉ. साळुंखे
Satara News Team
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
- बातमी शेयर करा
सातारा: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य समाजातील सर्व घटकासाठी अजरामर ठरणारे आहे.त्यामुळे त्यांच्या विचाराची आज गरज आहे.त्यांची जनता-जनार्धनासाठी झटणारे म्हणून अद्वितीय राजा म्हणून तहहयात अशी ख्याती राहील. असे प्रतिपादन डॉ.श्रीधर साळुंखे यांनी केले.
येथील श्री.छ.प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.साळुंखे मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, "राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी केलेल्या कार्यामुळे प्रगती आढळून येत आहे.तरुण पिढीने महापुरुषांची चरित्रे वाचली पाहिजेत.तपशीलांसह बारकाईने अभ्यासली पाहिजेत."
"अतिशय प्रेरणादायी लोकराजा होते.काळाचा पुढचा विचार ते करत असे. अनेक लोकोपयोगी सुधारणा त्यांनी घडवून आणल्या.सध्याच्या युवा पिढीने त्यांच्या चरित्राचा निश्चितपणे अभ्यास करावा. त्यातील वैशिष्ट्ये समजून घ्यावीत." असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांनी व्यक्त केले.
नगर वाचनालयाच्या कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी मनोगतात राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा अभ्यासपूर्ण असा आढावा घेतला. संचालक डॉ. राजेंद्र माने यांनी या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करून आभारप्रदर्शन केले. प्रारंभी, प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शिवाय दीपप्रज्वलनही मान्यवरांनी केले. यावेळी बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,ग्रंथपाल मुळे मॅडम,कर्मचारी वर्ग,नगर वाचनालयाच्या अभ्यासिकेतील अध्ययनार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 26th Jun 2023 03:26 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 26th Jun 2023 03:26 pm













