साताऱ्याचा यष्टिरक्षक-फलंदाज साहिल औताडेची महाराष्ट्र संघात निवड

१९ वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धा

सातारा, : साताऱ्यातील डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज साहिल औताडे याची १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे, अशी माहिती सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव इर्शाद बागवान यांनी दिली.
ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून  (बीसीसीआय) आयोजित करण्यात येते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १५ खेळाडूंचा संघ नुकताच निवडण्यात आला. कुचबिहार करंडक स्पर्धेचे सामने चार दिवसांचे (कसोटी) असतात. साहिल औताडेने जिल्हा क्रिकेट संघातून खेळताना आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याने राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे. महाराष्ट्र संघात स्थान मिळवून साहिलने सातारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र संघाचे सामने राजकोट, पुणे, पुदुचेरी येथे होणार आहेत. साहिलला शशी साळुंखे, रणजीत चव्हाण व कमलेश लांजेकर यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभले. या निवडीबद्दल साहिलचे माजी रणजीपटू केतन दोशी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निशांत गवळी, एम सी ए प्रतिनिधी कमलेश पिसाळ, आजी-माजी क्रिकेटपटू व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला