'वृक्ष माझा सखा' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना केले वृक्षांचे वाटप
Satara News Team एकनाथ वाघमोडे- Sat 16th Jul 2022 10:34 am
- बातमी शेयर करा
स्तुत्य उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षाचे वाटप करण्यासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्राच्या दहिवडी विभागाच्या वन अधिकारी सौ.भाग्यश्री ठाकूर, दहिवडी कॉलेजचे प्राचार्य डॉ. साळुंखे,ज्युनिअर विभाग उपप्राचार्या डॉ. नंदिनी साळुंखे,सीनिअर विभाग उपप्राचार्य डॉ.बळवंत,आयक्यूएसी समन्वयक डॉ.ए.एन.दडस, प्रा.सौ.पाटील,प्रा.व्ही.एस.म्हस्के,आदींसह कॉलेजच्या ज्युनिअर विभागाचे सर्व शिक्षक व बारावीच्या व्यवसाय शिक्षणाच्या तिन्ही शाखांचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते
दहिवडी : सध्याच्या काळात निसर्गाचा समतोल राखला जावा, बदलत्या प्रदूषित जगात विद्यार्थ्यांना त्याची जाणीव लवकर व्हावी या उद्देशाने दहिवडी कॉलेजमध्ये 'वृक्ष माझा सखा' या नवोपक्रमांअंतर्गत एक विद्यार्थी एक झाड या योजनेनुसार गुरुवारी कला,वाणिज्य,विज्ञान आणि व्यवसाय शिक्षण शाखेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक फळझाड याप्रमाणे वृक्षाचे वाटप करण्यात आले.या वृक्ष वाटपामागे काही उद्दिष्टे कॉलेजने विद्यार्थ्यांसमोर ठेवली होती त्यामध्ये दुष्काळी पट्ट्यातील माण तालुक्यातील वृक्षांची संख्या वाढवणे, निसर्गाचा समतोल राखणे, वन्यजीव प्राणी पक्षी यांना आश्रयस्थान निर्माण करणे, निसर्गातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे , फळप्राप्ती करणे पर्यावरणाचे प्रदूषण रोखणे, जमिनीतील पाणी पातळी वाढवणे ,निसर्गाचे सौंदर्य वाढवणे जमिनीची धूप रोखणे, विद्यार्थ्यांना कॉलेज जीवनात वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देणे आणि महत्त्वाचं म्हणजे माण तालुक्याचा दुष्काळी कलंक पर्यायाने कायमचा पुसणे या उद्देशाने विद्यार्थ्यांना हे वृक्ष देण्यात आले.हे वृक्ष दिल्यानंतर विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीची पद्धत ही सांगण्यात आली. त्याचबरोबर पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयांतर्गत पर्यावरण विषयाचे हेच प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांसाठी असेल,अशी माहिती पर्यावरण शिक्षक राहुल सूर्यवंशी यांनी दिली. त्यामध्ये हे झाड विद्यार्थ्यांनी आपल्या घरासमोर किंवा शेतात वाढवले तरी चालेल आणि वाढलेल्या झाडाचे फोटो जिओ टॅगला काढून कॉलेजच्या ग्रुप वर पाठवणे विद्यार्थ्यांना बंधनकारक केले आहे. त्यामुळे मार्क मिळवण्याच्या आशेने का होईना विद्यार्थी या वृक्षांचे संगोपन चांगल्या प्रकारे करतील अशी खात्री कॉलेज प्रशासनाला आहे. जर एखादे झाड जळून गेले तर त्या विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून विकत घेऊन दुसरे झाड लावावे लागेल. अशी त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहे, अन्यथा पर्यावरण शिक्षण विषयाचे गुण विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत असेही यावेळी सांगण्यात आले.या स्तुत्य उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षाचे वाटप करण्यासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्राच्या दहिवडी विभागाच्या वन अधिकारी सौ.भाग्यश्री ठाकूर, दहिवडी कॉलेजचे प्राचार्य डॉ. साळुंखे,ज्युनिअर विभाग उपप्राचार्या डॉ. नंदिनी साळुंखे,सीनिअर विभाग उपप्राचार्य डॉ.बळवंत,आयक्यूएसी समन्वयक डॉ.ए.एन.दडस, प्रा.सौ.पाटील,प्रा.व्ही.एस.म्हस्के,आदींसह कॉलेजच्या ज्युनिअर विभागाचे सर्व शिक्षक व बारावीच्या व्यवसाय शिक्षणाच्या तिन्ही शाखांचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यावरण शिक्षक प्रा.राहुल सुर्यवंशी यांनी वृक्ष संकलन केले व वृक्ष वाटपाचे नियोजन केले.
#sataranews
#dahiwadi
treeplantationnews
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 16th Jul 2022 10:34 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 16th Jul 2022 10:34 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 16th Jul 2022 10:34 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 16th Jul 2022 10:34 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 16th Jul 2022 10:34 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 16th Jul 2022 10:34 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sat 16th Jul 2022 10:34 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sat 16th Jul 2022 10:34 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sat 16th Jul 2022 10:34 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 16th Jul 2022 10:34 am













