धाकल्या पवारांच्या स्वागताला तरुणतर्क पवारांच्या गटातील ‘छुपे रूस्तम’ बाहेर पडणार ?

सातारा  : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताची सातारा जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्वागताचे बॅनर झळकले आहेत. बॅनर्सच्या माध्यमातून अनेक राजकीय पुढाऱ्यांची भूमिका उघड होणार असून काही छुपे रुस्तम उद्या प्रत्यक्ष दौऱ्यावेळी बिळातुन बाहेर येणार आहेत.
अजित पवार कोल्हापूरला जाताना सातारा आणि कराड शहरात दाखल झाल्यानंतर यांचे भव्य स्वागत होणार आहे यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित राहून त्यांचे स्वागत करणार आहेत. त्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांची भूमिका आणि राजकीय वाटचाल स्पष्ट होणार आहे.अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहें 
सत्तेत सहभागी झाल्यापासून अजितदादा एकदाही सातार्‍यात आलेले नाहीत. आज  त्यांची कोल्हापूर येथे सभा आहे. कोल्हापूर येथे सभेला जाण्यासाठी ते राष्ट्रीय महामार्गावरून सातार्‍यातून जाणार आहेत. अजितदादा प्रथमच सातार्‍यावरून जाणार असल्याने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यासाठी राष्ट्रवादीचा दुसरा गट सरसावला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर या प्रक्रियेत अग्रभागी आहेत. आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण हेही अजितदादांच्या स्वागताची जय्यत तयारी करत आहेत. महामार्गावर जे स्वागत शरद पवारांचे झाले, तेवढ्याच दणक्यात अजित पवारांचे स्वागत करण्याचे नियोजन आहे. उघड उघड दोन पवार गटांत संघर्षाची चिन्हे आहेत. कोणाचे स्वागत जोरात होणार यासाठीही चढाओढ होणार  हे नकीच  त्यातून कोणता पवार गट मोठा हे दाखवले जाणार आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांनी अजितदादांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला.तर  खासदार श्रीनिवास पाटील आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी आम्ही शरद पवार साहेबांसोबतच राहणार,असे जाहीर केले. आता या स्वगताची जबाबदारी आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांच्यासाठी  प्रतिष्ठेची होणार आहे.तर या माध्यमातून अनेक राजकीय पुढाऱ्यांची भूमिका उघड होणार असून काही छुपे रुस्तम आज प्रत्यक्ष दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री याच्या स्वागतासाठी बिळातुन बाहेर येणार आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला