श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्यु.कॉलेज करंजेपेठने राखले निकालात सातत्य
इयत्ता १० वी सेमी इंग्लिशचा १००% तर मराठी माध्यमाचा ९५.२३%निकालSatara News Team
- Tue 6th Jun 2023 01:21 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहराजवळ करंजेपेठ सातारा येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्यु.कॉलेज करंजेपेठने इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत उज्वल निकालाची परंपरा राखली..विद्यालयाच्या सेमी इंग्लिश वर्गाचा निकाल १००% तर मराठी माध्यमाचा निकाल ९५.२३% लागला असुन दोन विद्यार्थ्यांना शासना नियमाने पुढील वर्गात प्रवेश घेता येणार आहे..यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयाचा अष्टपैलू खेळाडू कब्बडी संघाचा कर्णधार यश संतोष शिंदे ९२.२०%गुण मिळवून पहिला तर आर्चरी खेळाची गुणी राज्यस्तर खेळाडू श्रद्धा जयवंत मोरे ८९.६०% गुण मिळवून दूसरी,शांत व संयमी विद्यार्थी रोहन पिंटू राजगुरु ८९% गुण मिळवून तिसरा,चित्रकला ग्रेड परीक्षा उत्तीर्ण सानिका वसंत राजे ८८.८०% गुण मिळवून चौथी तर म्हसवे गावची शांत व गुणी मुलगी विशाखा सुनील शेलार हिने ८८.६० % गुण मिळवून पाचवी आली..
इयत्ता १० वी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या १६८ विद्यार्थ्यांमधून १६२ विद्यार्थ्यांचं यश हे कौतुकास्पद यश मानल जात आहे..कारण करंजे हायस्कूलचे विद्यार्थी म्हणजे सर्व सामान्य घरातून आलेले विद्यार्थी संस्थेचे आद्य संस्थापक कै.साहेबरावजी पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी सर्वसामान्य घरातील मुला-मुलींना शिक्षण मिळावे या उद्देशाने स्थापन केलेल्या या विद्यालयात सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांबरोबर अगदी सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात..
संस्थेचे कार्यक्षम सचिव तुषार पाटील आणि संस्था चालकांच्या मार्गदर्शनात श्रीपतराव पाटील हे सर्व उपक्रमात नावाजलेल विद्यालय म्हणून गौरव प्राप्त झालेल विद्यालय आहे..
शिष्यवृत्ती परीक्षा तसेच कला,क्रीडा,साहित्य, सांस्कृतिक व विज्ञान विभागातील विद्यालयाची प्रगती संपूर्ण शाहूवासीय ज्ञात आहेतच
विद्याल्याच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक रविंद्र फडतरे पर्यवेक्षक अमर वसावे आणि सर्व शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनात मिळविलेल्या यशाबद्धल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार,उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत,नंदकिशोर जगताप, कार्यक्षम सचिव तुषार पाटील स्कूल कमेटी चेअरमन वत्सलाताई डूबल,संचालक प्रतापराव पवार,चंद्रकांत पाटील, प्रल्हाद पवार,संचालिका हेमकांची यादव, प्रतिभा चव्हाण, धनंजय जगताप,पिंटूशेठ जाधव आणि संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व सदस्य आणि हितचिंतक मंडळींनी विद्यालयाच्या निकालाचे कौतुक केले आहे.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Tue 6th Jun 2023 01:21 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Tue 6th Jun 2023 01:21 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Tue 6th Jun 2023 01:21 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Tue 6th Jun 2023 01:21 pm
संबंधित बातम्या
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Tue 6th Jun 2023 01:21 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Tue 6th Jun 2023 01:21 pm
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Tue 6th Jun 2023 01:21 pm
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 6th Jun 2023 01:21 pm










