इंटर झोनल आर्चरी स्पर्धेचे आयोजन लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय कडे

सातारा : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंटर झोनल आर्चरी मुला मुलींच्या स्पर्धांचे आयोजन लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाने दृष्टी आर्चरी अकॅडमी सातारा या ठिकाणी नुकत्याच संपन्न करण्यात आल्या या स्पर्धेमधून स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील सातारा,सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील आर्चरी खेळाडूंचा सहभाग या ठिकाणी होता.या स्पर्धेमध्ये एकूण 50 ते 55 मुला मुलींच्या आर्चरी खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धा इंडियन राउंड,कंपाउंड राउंड, आणि रिकव्हर राउंड या तीन प्रकारांमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेमधूनच शिवाजी विद्यापीठाचा आर्चरी संघांची निवड करण्यात आली. या स्पर्धेतील विजयी खेळाडू शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत पंजाब या ठिकाणी होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी आर्चरी स्पर्धेसाठी ते सहभागी होणार आहेत.या स्पर्धेचे उद्घाटक मा. युवराज नाईक साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. व्ही. शेजवळ तसेच शिवाजी विद्यापीठाचे निवड समितीचे चेअरमन प्रा. समीर पवार, प्रा. विक्रांत सुपूगडे,प्रा. प्रकाश चौगुले तसेच शिवाजी विद्यापीठाचे  निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले  डॉ.महादेव सूर्यवंशी सातारा जिल्ह्याचे जेष्ठ शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुनील खरात विविध महाविद्यालयातून आलेले शारीरिक शिक्षण संचालक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.या स्पर्धेचे प्रास्ताविक डॉ.विकास जाधव यांनी केले तसेच या उद्घाटनाचे आभार प्रदर्शन डॉ. अविनाश नलवडे सर यांनी केले. या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिनांक 7 डिसेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी सातारा जिल्ह्यातील मलखांब मधील शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा. सुजित शेडगे सर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर, प्रा.एन.व्ही. शिंदे, प्रा. डी. जी.साळुंखे, तसेच माननीय राजेंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरणाचा समारंभ करण्यात आला. तसेच विशेष सत्कारमूर्ती म्हणून सौ. सायली प्रवीण सावंत आणि सौ. शैला स्वामी मॅडम यांच्या शुभहस्ते इंटर झोनल आर्चरी मुला मुलींच्या टीम चॅम्पियनशिप देण्यात आली यामध्ये किसनवीर महाविद्यालय वाई यांनी प्रथम क्रमांक मिळवत जनरल चॅम्पियनशिप प्राप्त केली तसेच दुसरा क्रमांक लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाने मिळवत सेकंड जनरल चॅम्पियन चा बहुमान मिळवला. या स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे संचालक डॉक्टर शरद बनसोडे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.व्ही. शेजवळ यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले डॉ.विकास जाधव शारीरिक शिक्षण संचालक लाल बहादूर शास्त्री यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत दृष्टी आर्चरी अकॅडमी चे संकल्पक माननीय प्रवीण सावंत यांचे विशेष आभार व्यक्त केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला