'डॉल्बी'ला परवानगी पोलीस प्रशासनाकडून सशर्त मंजुरी

व्यावसायिकांनी मानले आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार

 सातारा-  शहर व परिसरामध्ये गेली सात वर्षांपासून साऊंड सिस्टीम (डॉल्बी) वाजवणेस स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे. सातारा शहर वगळता सातारा जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये साऊंड सिस्टीम (डॉल्बी) वाजवणेस परवानगी दिली गेली आहे. या दुजाभावामुळे सातारा शहर व परिसरातील साऊंड, लाईट, जनरेटर व्यावसायिकांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार शासनाच्या अटी व निकषानुसार साऊंड, लाईट आणि जनरेटर या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी अशी सूचना वजा मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार बन्सल यांनी डॉल्बीला सशर्त परवानगी दिली आहे. 

              डॉल्बी ला परवानगी मिळावी म्हणून साऊंड, लाईट आणि जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंची यांची मंगळवारी भेट घेऊन मागणीचे निवेदन त्यांना दिले होते. यावेळी सुनील काळेकर, असोसिएशनचे गणेश शिंदे, सुरेश हादगे, जयवंत कदम, अमित चव्हाण, माणिक आप्पा, प्रतीक भालेकर, संतोष लोंढे, दत्ता शिंदे, तुषार आंबवले, पंकज निकम, कुणाल गोरे, सत्यम नागे, हर्षद चव्हाण आदी उपस्थित होते. असोसिएशनच्या मागणीनुसार डॉल्बी सुरु करणेसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची मागणी करू असे आश्वासन देतानाच पदाधिकाऱ्यांच्या समोरच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हा पोलीस अधीक्षक बन्सल यांना दूरध्वनी करून डॉल्बी सुरु करण्याच्या संदर्भाने चर्चा करून व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी डॉल्बीला परवानगी द्यावी अशी सूचना केली होती. 
                दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनंतर आज झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत डॉल्बी ला परवानगी देण्याबाबत अधीक्षक बन्सल यांनी सकारात्मक निर्णय घेत डॉल्बीचे दोन बेस आणि दोन टॉप लावण्यास सशर्त परवानगी दिली आहे. यामुळे डॉल्बी व्यावसायिकांचा मोठा प्रश्न सुटला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. डॉल्बी व्यावसायिकांना दिलेला शब्द पूर्ण करून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी व्यावसायिकांचा मोठा प्रश्न सोडवला आहे. दरम्यान, डॉल्बीला परवानगी दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पोलीस अधीक्षक बन्सल यांचे आभार मानले

 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला