जिल्ह्यात संविधान यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

सातारा : जिल्ह्यात संविधान यात्रेचे मोठ्या उत्साहात आगमन झाले तेव्हा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.सांगता येथील राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कुल समोरील श्रीमंत छ.प्रतापसिंह भोसले पुतळा परिसरात करण्यात आली.
   जिल्ह्यात प्रारंभ कोल्हापूर नाका,कऱ्हाड येथे करण्यात आले.तेव्हा सविधानप्रेमींनी जोरजोरात घोषणा देऊन जंगी स्वागत करण्यात आले.तदनंतर यशवंतराव चव्हाण समाधी स्थळाला अभिवादन करण्यात आले.तेथून मुख्य रस्त्याने डॉ. आंबेडकर पुतळा आणि बुद्धविहारमध्ये बुद्ध वंदना आणि सभा घेण्यात आली. दुपारी साताराकडे रवाना झाली. दरम्यान,उंब्रज येथे स्वागत करण्यात आले. सातारा शहरात प्रवेश करते वेळेस वाढे फाट्यावर स्वागत करण्यात आले. हुतात्मा स्मारकांमध्ये अभिवादन करण्यात आले.तदनंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात यात्रा रवाना झाली. तेव्हा मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.त्यानंतर पदयात्रेने राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कूल परिसरातून फाशीचा वड शाहूपुरी येथेही भेट घेण्यात आली. करंजे (पैंजण टाइल्सजवळ) येथे बुद्ध विहारांमध्ये बुद्ध वंदना घेण्यात आली.त्यानंतर, "राम बोलो भाई राम"  या फिल्मचा शो दाखविण्यात आला. दैवज्ञ मंगल कार्यालय येथे मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव -  वडूज - दहिवडी - फलटण मार्गे  सांगोल्याला रवाना झाली.साताऱ्या नगरीत संविधान प्रणित विविध संघटना, राजकीय,सामाजिक आदी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. यामध्ये ऍड.वर्षाताई देशपांडे, चंद्रकांत खंडाईत, संदीप कांबळे, प्रकाश खटावकर, सय्यद,विजय मांडके,उमेश खंडझोडे,प्रा.जाधव आदी उपस्थित होते.
      स्वातंत्र्याची पंच्याहत्तरीमध्ये देखील रात्रंदिवस काबाड कष्ट करूनही मिळालेल्या मजुरीमधून अत्यावश्यक गरजाही भागविता येत नाहीत. असे सध्याचे वास्तव आहे. कोरोनाच्या काळात तर खरेच आपण स्वतंत्र देशांतील नागरिक आहोत का ? असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थितीचा सामान्यांनी मुकाबला केला होता. सर्वच बाबतीत दयनीय अवस्था झालेल्या भयावह गोष्टी होत्या. वस्तूवरील सेवा (GST) करामुळे केन्द्र सरकार तर मालामाल झाले. 
याच काळात दिल्ली सीमेवर शेतकरी यांनी केलेले १३ महिन्याचे ठिय्या आंदोलनाची दखल जगाला घ्यावी लागली. पण, आंदोलन मागे घेतांना पंतप्रधान मोदी यांनी दिलेले आश्वासन आजतागायत पाळले  नाही. ही वस्तुस्थित आहे. लोकांच्या कष्टकऱ्यांच्या जगण्याचे प्रश्नाकडे लक्ष केंद्रित होवू नये म्हणून  देशविघातक मुद्दे उपस्थित करून जाती-धर्मात भेद करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न होत असल्याने देशांतील सामाजिक संस्था व जनआंदोलनांनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येवून, "नफरत छोडो भारत जोडो" अशा प्रकारे संविधान  अभियानाची स्थापना करून एका बाजूला भारत जोडो यात्रेचे समर्थन तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ कि.मी.ची पदयात्रा संकल्प सुरू आहे.कोल्हापूरहून निघणारी यात्रा सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी- मार्गे नांदेड येथील परिषद स्थळी, देगाव येथे पोहोचणार आहे.अशी माहिती स्वराज् अभियान,स्वराज इंडिया,महाराष्ट्र आणि समविचारी  संघटनांच्या पदाधिकारी यांनी दिली. सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणाऱ्यांना दलित - आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्याक, मागासवर्गीय महिला आदींना आजही जाणिवपूर्वक गावकुसाबाहेर ठेवले जात आहे. परिणामी, स्वातंत्र्याची व लोकशाहीची फळ त्यांच्या पर्यंत पोहोचणार नाहीत. याचा काटेकोरपणे बंदोबस्त केला गेला आहे.आज हे सर्व घटक जागृत होवून आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवू लागल्याबरोबर त्यांच्यात भाजप - आर. एस. एस. जाती-धर्माचे नावाने बेदिली निर्माण केली जात आहे.म्हणूनच सावध करण्यासाठी व तमाम कष्टकऱ्यांच्या भक्कम एकजुटीसाठी सदरील यात्रा असून ठिकठिकाणी या यात्रेत सविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला