शिवरायांशिवाय कोणत्या राजाने काढलाय वाघनखांनी कोथळा? चुकीचा इतिहास पसरवणे थांबवा - शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : ‘जगात मोठमोठे राजे होऊन गेले. आपण ब्रिटिश राजवटदेखील पाहिली; परंतु छत्रपती शिवाजी महाराज वगळून अन्य कोणत्या राजाने वाघनखांनी कोथळा काढला, कोणाचा वध केला, याची कुठेही नोंद आढळत नाही. ऐतिहासिक महत्त्व आहे म्हणूनच ‘ती’ वाघनखे इंग्लंडच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती माझी आहेत अथवा मी बनवून दिली आहेत म्हणून ठेवली गेलेली नाहीत, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

सज्जनगड येथे रामदासी मठपती, संपर्क कार्यालय प्रमुख आणि कार्यकर्ते यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक विचारमंथन संमेलनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘जर मी म्हटलो माझा पेन संग्रहालयात ठेवायचा आहे, तर लोक तुमचा काय संबंध म्हणून मला विचारणा करतील; पण जर का माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा पेन संग्रहालयात ठेवला तर तो पाहण्यासाठी निश्चितच लोक येतील. ज्यांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे, अशाच व्यक्तींच्या वस्तू संग्रहालयात ठेवल्या जातात. मात्र, अलीकडे वाघनखांवरून प्रचंड राजकारण सुरू आहे. तरुणांपुढे चुकीचा इतिहास मांडला जातोय. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याच राजाची अशी नोंद कुठेही आढळून येत नाही. याचाही कुठेतरी विचार करायला हवा. जो काही चुकीचा इतिहास पसरवला जातोय तो थांबविण्यासाठी श्री रामदासस्वामी संस्थान व आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला