कास रस्त्यावर बेकायदेशीर कामे उध्वस्त करून पर्यावरणाचा समतोल राखावा. या साठी खर्च केलेले कोट्यावधी रूपये मालमत्ता धारकांनी कोणत्या माध्यमातून खर्च केले याची चौकशी व्हावी
अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ईडी आणि आयकर कार्यालयाकडे केलीओमकार सोनावणे
- Mon 22nd Aug 2022 10:46 am
- बातमी शेयर करा
सातारा- सातारा शहरालगत असलेले फुलांसाठी जागतिक पातळीवर नाव चर्चेत असलेले आणि मिनी महाबळेश्वर म्हणून नावलौकिक मिळालेल्या कास रस्त्यावर झालेली बेकायदेशीर कामे उध्वस्त करून पर्यावरणाचा समतोल राखावा. या कामासाठी खर्च केलेले कोट्यावधी रूपये मालमत्ता धारकांनी कोणत्या माध्यमातून खर्च केले याची चौकशी व्हावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ईडी आणि आयकर कार्यालयाकडे केली आहे.
सर्वसामान्य माणसांने घरबांधणीसाठी बँकतून कर्ज काढण्यासाठी गेल्यावर बँक अधिकारी प्रथम जागा बिगरशेती आहे का ? नगररचना विभागाची परवानगी आहे का हे प्रथम पहाणी करतात. कास हे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून या ठिकाणी बांधकाम परवानगी मिळू शकत नाही. १२४ मालमत्ता धारक धनदांडग्यांनी कोट्यावधी रूपये खर्चून बेकायदेशीर हाँटेल्स, रिसाँर्ट उभारली आहेत असा आरोप मोरे यांनी निवेदनात केला आहे.
बिगरशेती आणि नगर रचना विभागाची परवानगी या कामांसाठी उपलब्धता शक्यच नाही. अशा परिस्थितीत कोट्यावधी रूपये खर्चून अलिशान बंगले, हाँटेल्स ही करबुडवून दोन नंबर पैशातून उभारल्याची शंका मोरे यांनी उपस्थित केली आहे. या धनदांडग्यांना जिल्हाधिकारी, तहसिलदार या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले आहे. त्याशिवाय ही कामे होऊच शकत नाही. या बेकायदेशीर इमारती उभारणाऱ्या मालमत्ता धारकांच्यामागे राजकीय वरदहस्त असल्याने महसूल विभाग गेली अनेक वर्ष पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या मागणीला कचऱ्याची टोपली दाखवत आहेत पर्यावरणाचा असा गंभीर आरोपही मोरे यांनी केला आहे.
बेकायदेशीर बांधकामात करचूकवलेला पैसा असावा ही शंका असल्याने आयकर विभागाकडूनच चौकशी होऊन दूध का दूध, पाणी का पाणी झाली पाहिजे यासाठी चौकशीची मागणी केली आहे. राजकीय दबाव येण्याची शक्यता असल्याने या गंभीर प्रकरणाची चौकशी ईडी मार्फत व्हावी म्हणून या दोन्ही कार्यालयांना सबळ पुराव्यानिशी निवेदनाव्दारे चौकशीची मागणी केली आहे. दोन महिन्यात या सर्व बेकायदेशीर बांधकामाची चौकशी करून कारवाई न झाल्यास आंदोलनची भूमिका घेतली जाईल असा इशारा सुशांत मोरे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Mon 22nd Aug 2022 10:46 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Mon 22nd Aug 2022 10:46 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Mon 22nd Aug 2022 10:46 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Mon 22nd Aug 2022 10:46 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Mon 22nd Aug 2022 10:46 am
संबंधित बातम्या
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Mon 22nd Aug 2022 10:46 am
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Mon 22nd Aug 2022 10:46 am
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Mon 22nd Aug 2022 10:46 am
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Mon 22nd Aug 2022 10:46 am










