औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायीकांचा सुवर्णकाळ सुरू?

औंध पोलिसांचे सामान्य माणसाला भय, अवैध व्यवसायीकांना मात्र अभय?
Aundh police fear the common man, but the illegal traders are safe?

औंध  : औंध पोलिस ठाणे म्हणजे जणू आधुनिक काळातील सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असा कृत्रिम नियम निर्माण झाला आहे? कि करण्यात आला आहे? ही शंकाच आहे. या ठाण्यातील कारभाऱ्यांच्या इशाराऱ्यावर काम करणाऱ्या "कलेक्टर" शी अवैध व्यवसाय करणाऱ्यांची एकदा जवळीक निर्माण झाली कि समजून जायचे "अपनी तो निकल पडी...." नो एफ.आय.आर..... नो अरेस्ट... डायरेक्ट फैसला १ टू का ५ सुरू आहे?

      "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" ची शपथ दिल्यानंतर लोकशाहीत राजा असलेल्या सर्वसामान्य नागरीकांना न्याय आणि सुरक्षा मिळावी यासाठी याच लोकशाहीच्या राजांकडून कर रूपाने गोळा केलेल्या रकमेतून जनतेने जनतेच्या कल्याणासाठी निवडून दिलेल्या परंतू त्याची बहुदा जाण नसलेले लोकप्रतिनिधी एकत्रित करून निर्माण झालेल्या सरकार कडून जसा प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत मोबदला ऑनलाईन पद्धतीने संबंधिताच्या पदानुसार थेट खात्यात देण्यात येतो त्याला कदाचित शासनाकडून पगार असेही संबोधले जाते. त्याच धर्तीवर या अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून सुरक्षेसाठी "कलेक्टर" च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत ऑनलाईन अलाऊड नाही ओन्ली कॅश पद्धतीने संबंधिताच्या हातात जमा करून पदानुसार वाटप करण्यात येत असल्यानेच सदरचे अवैध व्यवसाय सुरक्षित सुरू असुन अवैध व्यवसायीकांचा सुवर्णकाळ असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

           सध्याच्या पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले मा.समिर शेख ज्यावेळी याच जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते त्यावेळी त्यांनी अवैध व्यवसायीकांच्या मुसक्या आवळल्याने ते कर्दनकाळ असलेल्या चर्चा जोमात सुरू होत्या. मग आता पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असताना अवैध व्यवसाय का? आणि कशामुळे? उभारी घेत आहेत हा यक्षप्रश्न आहे.

          औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामस्थ अथवा विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांना पोलिस प्रशासनास निवेदन द्यावे लागते हि शोकांतिका आहे. या निवेदन देणाऱ्यांना जे व्यवसाय संविधानाच्या चौकटीतून अवैध वाटतात ते व्यवसाय संबंधित पोलिस प्रशासनाच्या कोणत्या चष्म्यातून वैध असल्याने ते सुरू आहेत? जर त्यांच्याही नजरेतून हे व्यवसाय अवैध असतील तर या अधिकाऱ्यांच्या नावाचा दुरूपयोग करून सुरक्षेची हमी देत अवैध व्यवसायीकां कडून मोबदला रूपी मंथली घेऊन अशी कोणती यंत्रणा कार्यरत आहे? याचाही तपास घेण्याची तसदी संबंधित प्रशासनाकडून होत नसल्याची चर्चा जनमानसात लोकप्रिय होत आहे.


औंध च्या कारभाऱ्यांनी युवकांना कसे उपलब्ध केले "रोज गार" ?

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दोन गटाला शहर, गांव किंवा वाडी वस्ती अपवाद नाही. मग पुसेसावळी परिसर या शर्यतीत अग्रेसरच. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर तक्रारी, निवेदने देऊनही औंध च्या कारभाऱ्यांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय करणाऱ्या दादा, भाई, भाऊ, शेठ अशा मालकांवर कोणत्याच प्रकारची कारवाई न करता अंगावर गुन्हे घेत तुटपुंज्या रकमेतून उदरनिर्वाह करणाऱ्या जमातीवर मार्च एन्डींग च्या नावाखाली गुन्हे दाखल केल्याचे दिसून येते. मात्र मालक आणि चालक हे जोमाने कामाला सुरुवात करतात. याचाच परिणाम म्हणून जर सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद होत नाहीत, तर त्यांच्या कडून जो (मोबदला) घेता तोच आमच्याकडून ही घ्या म्हणत  बेरोजगार युवकांना नव्याने "रोज गार" उपलब्ध झाल्याने अवैध व्यवसायीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला