थंड हवा खाण्यासाठी दरवर्षी येणारा लाखो पर्यटक पाचगणी थांबवण्यासाठी मास्टर प्लॅन ची गरज
Satara News Team
- Sat 27th Aug 2022 06:06 am
- बातमी शेयर करा
पाचगणी : पाचगणी हे पर्यटनस्थळ आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांनीच आपल्या परीने हातभार लावने गरजेचे आहे . येथे येणाऱ्या देशविदेशी पर्यंटकांवर येथील जीवनमान खरे तर अवलंबून आहे. अलीकडच्या काळात पाचगणीकडे पर्यटकांचा ओढा कमी राहिला असल्याचे जाणवू लागले आहे. असणारा ओढा हा महाबळेश्वर ‘फुल्ल’ झाल्यावर दिसतो. पाचगणीतील टेबल लॅंड, सिडनी पॉइंट व पारशी पॉइंट सोडल्यास पाचगणीत पर्यटकांना रेंगाळण्यासाठी कुठल्याही नव्या पर्यटनस्थळाची निर्मिती झालेली दिसत नाही. पर्यटकांना दिवसभर पाचगणीत थांबवून ठेवण्यासाठी नव्या पर्यटनस्थळांबरोबर इतर कल्पकता दाखवण्याचे पाचगणी पर्यटनासाठी अत्यंत गरजेची बाब झाली आहे यासाठी आत्तापर्यंत अनेक वेळा सत्ता स्थापन झाल्या मात्र नव्याने पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून कोणताही नवीन पॉईंट अथवा पर्यटकांना पाचगणीत खेळवून ठेवण्यासाठी नवीन योजना अद्यापही झाली नाही ही खंत मात्र कायमस्वरूपी पाचगणी करांना राहिली आहेदुसरीकडे येथे जागा खरेदी करून आपला टुमदार असा बंगला उभारण्याची सध्या येथे स्पर्धा सुरू आहे. मुंबई-पुण्याच्या लोकांचा ओढा वाढू लागला आहे. मग बांधकामांसाठी बेसुमार वृक्षतोड होताना दिसते. परिणामी निसर्गसंपदेची संपत्ती वाया जाऊ लागली आहे. पुण्या मुंबईच्या धन दांडग्यांनी स्थानिकांच्या आर्थिक मजबुरीचा फायदा घेऊन कवडीमोल किमतीने जमिनी घेतल्या आपले स्वतःचे मोठमोठे इमले हॉटेल्स व्यवसाय वाढवले मात्र स्थानिकांच्या रोजगारांचे काय त्यांनी छोटे-मोठे किरकोळ व्यवसाय करायचे एवढेच यांच्या नशिबी मात्र पर्यटन व्यवसाय वाढ होत असताना महाबळेश्वरच्या दिशेने जात असणारा पर्यटक पाचगणीला केवळ काही तासासाठीच थांबायला येतो ही मानसिकता आता बदलले काळाची गरज आहे त्यासाठी राज्यकर्त्यांनी देखील याच्यावर गंभीर विचार करणे गरजेचे आहे जगात पर्यटन वाढत असताना जगाच्या नकाशावर स्वच्छ सुंदर पाचगणी म्हणून नावारूपाला आलेल्या हे गिरीस्थान थंड हवेचे ठिकाण कायमस्वरूपी पर्यटकांच्या हृदया रहावं यासाठी ठोस उपाययोजना करणे काळाची गरज आहेनिसर्गाच्या मुळावर उठलेल्या या राक्षसी अशा वृत्तीला वेळीच रोखून पर्यावरण वाचवण्याबरोबरच नव्या बांधकामधारकांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले पाहिजे. या दोन गोष्टींवर भर दिला तर पाचगणीच्या पर्यटनाला गतवैभव प्राप्त होणार आहे.पाचगणीत असणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शैक्षणिक संस्था याही शहराचे वैभव आहेत. देशविदेशी विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. अलीकडे या विद्यार्थ्यांची संख्याही रोडावली आहे. या संस्थांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शासकीय नियम धाब्यावर बसवून या शाळांची मनमानी सुरू आहे. भरमसाट फीमुळे स्थानिक व गरिबांना शिक्षण दुरापास्त होऊ लागलेले आहे. त्यावर पालिका शिक्षण विभागाने लक्ष घालून स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुली करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पाचगणी शहरात वाढत्या वाहनांच्या संख्येने पार्किंगची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यावर ठोस उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. यावर पालिकेच्या मार्केटमध्ये मोठ्या शहरांच्या धर्तीवर पार्किंग व व्यावसायिक गाळे तयार केल्यास पार्किंगच्या समस्येवर उत्तर मिळू शकते. यासाठी मोठा निधी मिळवण्यासाठी प्रत्यक्षात मिळालेला निधी त्याच कामासाठी लावून पारदर्शकता आणणे गरजेचे आहे पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांनी पाचगणीला गतव्य प्राप्त करण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून खऱ्या अर्थाने प्रयत्नाची परा कष्ट केली पाचगणी देशात स्वच्छ सुंदर क्रमांक मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्याला इतर नगरसेवकांची किती साथ मिळेल हा संशोधनाचा भाग आहे मात्र पाचगणी पालिका कर्मचारी प्रशासन व काही ठराविक नगरसेवक व विद्यमान नगराध्यक्ष यांनी मात्र खऱ्या अर्थाने पाचगणीचा लौकिक देश पातळीवर वाढवण्यासाठी प्रयत्न केले हे विसरून चालणार नाही.पाचगणीची कबड्डी महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. तर फुटबॉल, क्रिकेट, बॉस्केटबॉलसह इतरही राज्यपातळीवरील स्पर्धा येथे होत असतात. राज्य व देशपातळीवरील खेळाडू पाचगणीत तयार होण्यासाठी सुसज्ज अशा क्रीडासंकुलाचाही प्रश्न भेडसावत आहे. पालिकेनेही याबाबत आराखडा तयार केलेला आहे. या आराखड्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी अद्यापही अजून कागदावरील आराखडा प्रत्यक्षात मैदानावर उतरलेला नाही त्यासाठी डोंगर कपाऱ्यातील असणारे कसदार खेळाडू पाचगणीत आजही आहेत त्यांना खऱ्या अर्थाने मैदान उपलब्ध होत नाही म्हणून राज्यस्तरावर व देश पातळीवर हे चमकणारे खेळाडू नक्कीच मैदान उपलब्ध झाल्यावर जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उंचावतील मात्र त्वरित कागदावरील प्रोजेक्ट मैदानावर उतरणे गरजेचे आहे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली काढण्यात माजी नगराध्यक्षा यशस्वी झाल्या असल्या तरी कचऱ्याच्या प्रश्नावर आणखी गतिमान पद्धतीने काम करणे गरजेचे आहे सध्या पाचगणी नगरपालिका व प्रशासक आहेत पाचगणी नगरपालिका मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी देशात स्वच्छतेचा क्रमांक मिळवलेला पाचगणी शहराची स्वच्छता अबाधित ठेवण्याचे कसोशीने प्रयत्न ठेवले आहेत गिरीश दाबके कर यांच्या माध्यमातून पाचगणी नगरपालिकेला एक मुख्याधिकारी कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण त्यांच्या कर्तव्यातून त्यांनी दाखवून दिले आहेशहरातील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत त्यापैकी बुधवारच्या आठवडे बाजारातील विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या विक्रेत्यांना जागेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावरही ठोस कार्यवाहीची सुरुवातीला झाली मात्र पुन्हा पाढे 55 अशीच अवस्था आज ही आहे. पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमधील खेळण्यांच्या दुरवस्थेची पाहणी करून मुलांसाठी खेळण्याचे असणारे हे एकमेव ठिकाण नव्याने विकसित होणे आवश्यक आहे. टेबल लॅंडवरील व्यावसायिकांचा प्रश्न बरेच वर्षे रेंगाळत आहे. या व्यावसायिकांच्या प्रश्नावर सकारात्मकतेने विचार करून तो सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. येथील ‘एफएसआय’चा (चटईक्षेत्र वाढ) प्रश्न हा मोठा आहे. चटईक्षेत्रासाठी १९६७ नंतर १९८२ मध्ये या नियमांची पुनर्रचना झाली. त्यानंतर कसलाही बदल झालेला नाही. हे मात्र आजही प्रश्न पाचगणीच्या विकासासाठी आ वासून उभे आहेत सोडवण्याचा प्रयत्न होतोय मात्र त्याला प्रत्यक्षात यश काय येत नाही असा सवाल देखील आता पाचगणी शहरातून उपस्थित होऊ लागला आहे लोकसंख्या वाढली. परंतु, यातील किचकट नियमांमुळे नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या नियमात सुधारणा करण्यासाठी आगामी काळातील सत्ताधारी जे खुर्चीवर बसतील त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे मात्र त्यापूर्वीच मुख्याधिकारी गिरीश दाबके कर यांनी देखील या प्रश्नावर आता खऱ्या अर्थाने लक्ष देणे गरजेचे आहे.लीज वाढीचा प्रश्नही पाचगणीत प्रलंबित आहे. नियम लागू करून लीज वाढवल्यास पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होणार आहे. धनिक मात्र शासकीय नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावत आपले मनाप्रमाणे इमले बांधत आहेत. या प्रश्नावर ठोस काम करणे गरजेचे आहे. तक्रारीवरून मुख्याधिकारी कारवाई करत आहेत गावठाणवाढीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे इको सेन्सिटिव्ह झोनबाबतही पुनर्विचार होणे गरजेचे आहे. हेरिटेज प्रॉपर्टींबाबतही मोठा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. नव्या पर्यटनस्थळांची निर्मिती... कचरा, पाणी, स्वच्छता, ड्रेनेज, रस्ते हे प्रश्न सोडवण्यासाठी पालिका नेहमी आघाडीवर असते. या प्रश्नांसाठी आतापर्यंतच्या सर्वच राजकारण्यांनी आपापल्या पद्धतीने विकासाचा गाढा पुढे ओढला आहे. मात्र तो गाढा पुढे ओढण्यासाठी वेगळ्या शक्तीची गरज आहेगणपती पासून ते जून पर्यंत ते नऊ महिन्यात महाबळेश्वर पाचगणी फिरण्यासाठी आलेला पर्यटक हा पाचगणी मध्ये कसा थांबेल पाचगणीचा स्थानिक रोजगार कसा वाढेल पर्यटनवाढ, नव्या पर्यटनस्थळांची निर्मिती, पार्किंग, टेबल लॅंडवरील व्यावसायिकांचा प्रश्न, लीज, चटईक्षेत्र वाढ, स्थानिकांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, इको सेन्सिटिव्हचा प्रश्न, लहान मुलांच्या खेळण्याची बाग, सुसज्ज क्रीडांगण, हेरिटेज प्रॉपर्टी, आठवडे बाजारातील वाढत्या भाजी विक्रेत्यांच्या बैठकीचा प्रश्न अशा एक ना अनेक नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे आता आगामी काळातल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे व विद्यमान पाचगणीचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी देखील हे सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष प्रयत्न व मानसिकता उराशी बाळगून खऱ्या अर्थाने शासन दरबारी हे प्रश्न मांडून पाचगणीचा पर्यटनाचा लौकिक वाढवण्यासाठी व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे काळाची गरज निर्माण झाली आहे तरच पाचगणीचा विकास साधता येणार आहे
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sat 27th Aug 2022 06:06 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sat 27th Aug 2022 06:06 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sat 27th Aug 2022 06:06 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sat 27th Aug 2022 06:06 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sat 27th Aug 2022 06:06 am
संबंधित बातम्या
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sat 27th Aug 2022 06:06 am
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sat 27th Aug 2022 06:06 am
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sat 27th Aug 2022 06:06 am
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sat 27th Aug 2022 06:06 am










