सातारा जिल्हा परिषदेच्या 73 गट व पंचायत समितीच्या 146 गणांच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी
प्रकाश शिंदे - Sun 24th Jul 2022 07:22 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या 73 गट व पंचायत समितीच्या 146 गणांच्या आरक्षणाची सोडत गुरुवार दि.28 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व तालुका स्तरावरील तहसील कार्यालयात होणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीमध्ये कुणाचा पत्ता कट होणार, तर कुणाला लॉटरी लागणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुकांनी मात्र आपल्या सोयीचे आरक्षण पडावे, यासाठी देव पाण्यात घातले आहेत.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये पूर्वी 64 गट व पंचायत समित्यांचे 128 गण होते. परंतु, नव्या रचनेनुसार जिल्ह्यात 9 जिल्हा परिषद गटांची वाढ होऊन त्यांची संख्या 73 वर पोहोचली आहे. पंचायत समित्यांच्या गणांमध्ये 18 ची वाढ होऊन ती संख्या 146 वर पोहोचली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची गट व गण रचना अंतिम झाली होती. मात्र, दि. 13 जुलै रोजी आरक्षण सोडत होती; पण ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आरक्षण सोडत कधी निघणार याकडे इच्छुकांचे डोळे लागून राहिले होते. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीच्या नव्या कार्यक्रमानुसार व नवीन रचनेनुसार ही प्रक्रिया होणार आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण दिले आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील 2 गट व 4 गण, वाईमधील 5 गट व 10 गण, खंडाळ्यातील 3 गट व 6 गण, फलटण तालुक्यातील 9 गट व 18 गण, माणमधील 5 गट व 10 गण, खटाव मधील 8 गट व 16 गण, कोरेगावमधील 6 गट व 12 गण, सातार्यातील 10 गट व 20 गण, जावलीतील 3 गट व 6 गण, पाटणमधील 8 गट व 16 गण, कराडमधील 14 गट व 28 गणांमधील ही आरक्षण सोडत ओबीसी आरक्षणासह काढण्यात येणार आहे. दि. 26 जुलै रोजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला यांच्यासाठी आरक्षण सोडतीची सुचना प्रसिध्द केली जाणार आहे. दि. 28 जुलै रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. दि. 29 जुलै रोजी जिल्हाधिकारी सोडतीनंतर निवडणूक विभाग निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारुप अधिसूचना प्रसिध्द करणार आहेत. दि. 29 जुलै ते 2 ऑगस्ट अखेर जिल्हाधिकार्यांकडे हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी असून दि. 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार करुन अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.
satarazp
grampanchayt
nagarpanchayt
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 24th Jul 2022 07:22 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 24th Jul 2022 07:22 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 24th Jul 2022 07:22 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 24th Jul 2022 07:22 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 24th Jul 2022 07:22 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 24th Jul 2022 07:22 am
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 24th Jul 2022 07:22 am
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Sun 24th Jul 2022 07:22 am
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Sun 24th Jul 2022 07:22 am
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 24th Jul 2022 07:22 am
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Sun 24th Jul 2022 07:22 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Sun 24th Jul 2022 07:22 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 24th Jul 2022 07:22 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Sun 24th Jul 2022 07:22 am











