शिंदेसाहेब ,कोरेगाव की जावळी?... एकदा ठरवाच !

जावळी  : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ,खासदार शरद पवार यांच्या गटाची जिल्ह्यात ताकद वाढवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी कंबर कसली आहे कोरेगाव मतदार संघातून ते इच्छुक असले ,तरी सातारा -जावळी मतदारसंघ त्यांच्या मनात घर करून  आहे. आताच्या राजकीय स्थित्यंतराने त्यांना सातारा- जावळीतून लढण्याची संधी आली आहे त्यासाठी खुद्द जावळीकरातूनच मागणी होऊ लागली आहे; पण शरद पवार यांच्या आदेशाची ते वाट पाहणार असल्याने कोरेगाव की सातारा- जावळी   द्धिधावस्थेत आमदार शिंदे असल्याचे दिसत आहे. ही द्धिधावस्था वेळेत दूर झाली नाही, तर तेल ही गेलं आणि तूपही गेलं.... ' अशी अवस्था होण्याची शक्यता आहे. 

 

        राष्ट्रवादीच्या फुटीला जबाबदार असलेल्या भाजपला हिसका दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार गट आता सक्रिय झाला आहे. जिल्ह्याची धुरा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर खांद्यावर आहे. त्यांनी स्वाभिमान सभेच्या माध्यमातून सातारा जावळी मतदारसंघात काल केलेल्या शक्ती प्रदर्शन अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. . तब्बल 14 वर्षानंतर आमदार शशिकांत शिंदेचे पहिल्यांदा जावळी तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. त्यामागे जावळीकरांशी असलेले त्यांची भावनिक नाते व जावळीचा सुपुत्र म्हणून त्यांच्या प्रती प्रत्येकाच्या मनात असलेले प्रेम हे कारण आहे. या शक्ती प्रदर्शनातून बहुतांशी जावळीकरांनी त्यांना 'साहेब पुन्हा जावळीतून निवडून लढा ' अशी आर्त हाक दिली आहे. 
2009 मध्ये खासदार शरद पवारांच्या सांगण्यावरून आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावतून शालिनीताई पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना पराभूत केले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत ही ते दुसऱ्यांदा कोरेगाव मतदारसंघातून आमदार झाले. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या नवख्या महेश शिंदे यांनी ६२३२ मतांनी पराभव केला. या पराभवासाठी राष्ट्रवादीचा एक गट त्यांच्या विरोधात सक्रिय होता. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही पुरेशी मते असून केवळ एका मताने त्यांचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या  जिव्हारी लागलेला आहे. यातून ते  कधी कधी स्वगृही येऊन  सातारा जावळीतून लढण्याचे सुतोवाच करत आहेत. 

 

       शिवेंद्रराजे भोसले  राष्ट्रवादीत असताना आमदार शशिकांत शिंदे यांनी कधी जावळीतून निवडणूक लढवण्याची भाषा केली नव्हती; पण आत्ताच शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यानंतर शशिकांत शिंदे पुढे कोरेगाव सोबतच  सातारा -जावळीचा  पर्याय उपलब्ध झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  शिंदे -फडवणीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर साताऱ्यातील राष्ट्रवादीही दुभंगली गेली. शरद पवार गटाची सर्व जबाबदारी आमदार शशिकांत शिंदे वर आली. शरद पवार गटाची जिल्ह्यात ताकद वाढवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी कंबर कसली आहे. जरी ते कोरेगावातून इच्छुक असले तरी सातारा -जावळीही त्यांच्या मनात घर करून आहे. 
  आत्ताच्या राजकीय स्थित्य़ंतराने तर त्यांना सातारा जावळीतून लढण्याची आयती संधी आली आहे. त्यासाठी खुद्द जावळी करातूनच अशी मागणी होत असल्याने आमदार शशिकांत शिंदेंना केवळ खासदार शरद पवारांच्या आदेशाची गरज आहे. पण यासाठी स्वतः शशिकांत शिंदेंना विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. सध्या राजकीय गणिते प्रत्यक्ष निवडणूक लागण्याच्या वेळी बदललेली असणार आहेत. त्यामुळे आता तरी कोरेगाव की सातारा -जावळी? याबाबत आमदार शशिकांत शिंदेच्या मनात द्धिधावस्था आहे. त्यामुळेच ते ठामपणे भूमिका घेत नाहीत. जिल्ह्यात आजही त्यांच्याच पक्षातील आणि विरोधी पक्षातील विरोधक त्यांना अडविण्याचा प्रयत्न आहेत. कारण शरद पवार गटात एकमेव आमदार शशिकांत शिंदे हेच जिल्ह्याचे प्रत्येक मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीची ताकद वाढवू शकतात, हे सत्ताधारी व विरोधकांना पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे शिंदेंना संभ्रमात ठेवून त्यांना अडविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या अजित पवार गट व भाजप, शिंदे गट शिवसेनेकडून होत राहणार आहे. यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद वाढविताना शशिकांत शिंदेंनी स्वतःसाठी  कोरेगाव की सातारा-  जावळी सुरक्षित आहे, हे ठरवावे लागेल. 

 

    त्यांना कोरेगावातून येणारी निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे. कारण आमदार महेश शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे अपात्र ठरले तर आमदार शशिकांत शिंदेंना मैदान मोकळे राहणार आहे. ते अपात्र ठरले नाही तर मात्र, कोरेगावात दोन शिंद्यांची जबरदस्त लढत पाहिला मिळेल.

 

    सातारा - जावळीत भाजपचे आमदार  शिवेंद्रराजांनीही चांगले बस्तान बसवले आहे. आमदार शिवेंद्रराजे जावळी - सातारा मतदारसंघात मजबूत पकड आहे. शशिकांत शिंदे यांना शिवेंद्रसिंहराजे कधीही जड जाऊ शकतात.. 
प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ  घेऊन कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. दोन साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपलेसे केले आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाची साथ ही त्यांना मिळणार आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे विरोधात लढताना आमदार शशिकांत शिंदेंना जावळी सोबतच सातारा तालुक्यात बांधणी करावी लागेल. ही बांधणी एकट्याने होणार नाही. त्यांना खासदार उदयनराजे ची सोबत घ्यावी लागेल. त्यामुळे हेही तितकेच सोपे असणार नाही. परिणामी, आमदार शशिकांत शिंदेंना कोरेगाव की सातारा - जावळी या संभ्रमातून बाहेर पडावे लागेल. 


शिंदेसाहेब ,कोरेगाव की जावळी ? एकदा ठरवाच!

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला