बोरगाव पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यांना घेतले ताब्यात
Satish Jadhav
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरस गेलेली युनिकॉर्न मोटरसायकल तसेच आणखी चार दुचाक्या असा एकूण तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली बोरगाव पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत केल्या. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, माजगाव ता. सातारा या परिसरातील वरदराज पेट्रोल पंप येथून होंडा कंपनीची युनिकॉर्न क्रमांक एम एच ११ बी सी ५२६२ ही गाडी चोरीस गेल्या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी प्रकटीकरण शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या, या शाखेची अंमलदार पेट्रोलिंग करत असताना आंबेवाडी गावाजवळ होंडा कंपनीची विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल वरून संशयित जात असताना दिसले, त्यांच्याकडे चौकशी केली असता कागदपत्राच्या बाबत उडवा उडवीची उत्तरे देऊन लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केल्याने, एका मित्राच्या सोबत ही मोटरसायकल माजगावच्या हद्दीत चोरली असून आणखी चार मोटरसायकली सातारा परिसरातून चोरून आंबेवाडी गावच्या मित्राच्या शेतात लपवून ठेवल्या आहेत, असे सांगितल्याने त्या शेडमध्ये चार मोटर्स सायकली मिळून आल्या, पंचनामा करून पाच मोटरसायकली जप्त केल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, डॉक्टर वैशाली कडुकर, राजीव नवले, रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत चव्हाण, केतन जाधव, संजय जाधव, विशाल जाधव यांनी कारवाई केली. पुढील तपास दबडे करीत आहेत.
#crime
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 26th Sep 2024 12:19 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Thu 26th Sep 2024 12:19 pm













