महाराष्ट्रातील जागतिक विक्रमवीर बालगिर्यारोहिका पाच वर्षाची शर्विका जितेन म्हात्रे हिने पुन्हा एकदा केली एक उत्तुंग कामगिरी

महाराष्ट्रातील जागतिक विक्रमवीर बालगिर्यारोहिका देशमुखनगर (सतिश जाधव) : लोणारे ता. अलिबाग जि. रायगड येथील पाच वर्षाच्या शर्विका जितेन म्हात्रे हिने पुन्हा एकदा एक उत्तुंग कामगिरी करून आपल्या क्षेत्रातील कर्तुत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे,
यावेळी शर्वीकाने ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगड हा अतिशय कठीण असा किल्ला सर्वात कमी वयात सर करून संपूर्ण महाराष्ट्रात गिर्यारोहण क्षेत्रात आपले नाव पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे,
 श्रीमलंगड हा महाराष्ट्रातील कठीण किल्ल्यांच्या यादीतील असणारा किल्ला सर करण्यासाठी जिद्द धाडस आणि आणि प्रगल्भ इच्छाशक्तीची आवश्यकता असते,अरुंद पायऱ्या,खोल दरी,अवघड वाट आणि सोसाट्याचा वारा ह्या अडथळ्यांना पर करून श्री मलंग गडाचा माथा गाठावा लागतो, श्री मलंगड हा किल्ला तीन टप्प्यात विभागला असून  त्याचे पीर माची ,सोन माची आणि बालेकिल्ला असे तीन भाग आहेत, पीर माची आणि सोन माची चढाईसाठी मध्यम स्वरूपाची असून बालेकिल्ला सर करण्यासाठी अतिशय कठीण मानला जातो, श्री मलंग गडाचा बालेकिल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्र तसेच गिर्यारोहण मार्गदर्शकांची आवश्यकता असते, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर या संस्थेच्या मार्फत शर्वीकाने योग्य मार्गदर्शक आणि सुरक्षित गिर्यारोहण साहित्यांच्या आधारे श्रीमलंगड सर करून भगवा ध्वज फडकवला आहे तसेच तिने किल्ल्याच्या माथ्यावर जाऊन शिवरायांचा जयघोष केला आहे..
तिच्या ह्या मोहिमेत महाराष्ट्रातील सातारा,पुणे,मुंबई आणि नाशिक येथील काहि गिर्यारोहक सहभागी झाले होते,त्यामध्ये डॉक्टर संदीप सुभाष भिंगारदेवे,सातारा ह्यांचा सुद्धा समावेश होता, शर्विकानी यापूर्वी अनेक कठीण किल्ले सर केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तैल बैला, हरिहर भैरवगड असे किल्ले आहेत यापुढे देखील तिला महाराष्ट्रातील अनेक कठीण सुळके आणि कठीण किल्ले सर करायचे आहेत, शर्वीकाने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 61 किल्ले सर केले असून तिची ह्या आधी दहा रेकॉर्ड बूक मध्ये नोंद झालेली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने वर्ल्ड बुक रेकॉर्ड,इंडिया बुक रेकॉर्ड आणि आशिया बुक रेकॉर्ड या रेकॉर्ड बुकचा समावेश आहे तसेच रायगड जिल्ह्यातील अत्यंत मानाचा रायगड भूषण हा सर्वात कमी वयात मिळवणारी शर्विका ही महाराष्ट्रातील पहिली कन्या आहेत यापूर्वी अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी तिची घेतली असून तिला विविध क्षेत्रातील असंख्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत,तिच्या ह्या उत्तुंग कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे...

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला