चाफळ : पाटण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिराचे सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. यासाठी कोल्हापूर व उंब्रज येथील पटेल बंधूंनी मंदीराचे रंगकामासाठी सुमारे 10 लाखाचा निधी देत आपला प्रभुराम चरणी असलेला भक्तिभाव प्रकट केला आहे. पटेल बंधूंच्या या दातृत्वामुळे ‘चा प्रत्यय चाफळकरांना आला आहे. श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, हरिभाई पटेल, दयाभाई पटेल, विनोदभाई पटेल, डॉ. पाटील, रतनसी पटेल, हिम्मतभाई पटेल, भावेश पटेल, ल. सि. बाबर, व्यवस्थापक बा. मा. सुतार, वैभव कुलकर्णी, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ऊन, वारा, पावसाचा बराचसा कालावधी ओलांडल्यामुळे मंदिराचा रंग निघून गेला होता. त्यामुळे मंदिराला रंगकाम करणे गरजेचे बनले होते. श्रीराम दर्शनासाठी आलेल्या कोल्हापूर व उंब्रज येथील पटेल बंधूंना याबाबत ट्रस्टने कल्पना दिली असता पटेल बंधूंनी या कार्याला तात्काळ होकार देत रंगकामास 10 लाख रूपयांचा निधी दिला. प्रत्यक्ष मंदीराचे रंगकामास प्रारंभ करण्यात आला असून लवकरच या मंदिराला नव्याने झळाळी येणार आहे . त्यामुळे भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शुभारंभ प्रसंगी उपस्थितांचे आभार
Satara News Team
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
- बातमी शेयर करा
कराड : पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर यांनी कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना कराड शहरात होणाऱ्या चेन स्नॅचिंगचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन सदरचे गुन्हे रोखण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक कराड शहराचे वेगवेगळया भागात पथक तयार करुन प्रतिबंधक गस्त करीत होते.
दि. 08 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हे पकटीकरण पथक कराड शहर तसेच उपनगरात चेन स्नॅचिंगचे अनुषंगाने प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांचे गोपनीय बातमीदाराने मलकापुर ते ढेबेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर एक इसमाने चाकुचा धाक दाखवुन महिलेच्या गळयातील सोन्याची चेन हिसकावुन घेवनु पळाल्याचे माहिती दिली. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकास तात्काळ घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे हे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास नागरीकांचे मदतीने शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीचे ताब्यातुन एकुण 30,000/- रुपये किंमतीची अर्ध्या तोळयाची सोन्याची चेन व धारधार शस्त्र जागीच जप्त करण्यात आले आहे.
सुरेश सिध्दाप्पा दौडमणी वय 30 वर्षे रा. कोयना वसाहत मलकापुर ता. कराड जि. सातारा असे संशयीताचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन.पाटील (कराड शहर पोलीस ठाणे ) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक पवार, सफौ. रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 9th Feb 2024 04:23 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 9th Feb 2024 04:23 pm













