शिवाजी विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पूर्व पथसंचलन निवड शिबीर उत्साहात
एकनाथ वाघमोडे- Fri 30th Sep 2022 09:44 am
- बातमी शेयर करा
खेल व युवा मंत्रालय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पूर्व पथसंचलन निवड चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.विद्यापीठ प्रशासनाने अगदी तंतोतंत नियोजन करत हे निवड प्रक्रिया शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यामध्ये एकूण ५६ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली.
या समारोप समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ.प्रशांतकुमार वनंजे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने केलेल्या सर्वांगीण नियोजनाचा आणि आयोजनाचा आढावा घेत राष्ट्रीय योजना विभागाची उद्दिष्टे आणि येणाऱ्या काळातील करण्यात येणारी कामे त्याचबरोबर विविध तरतुदींचा उलगडा केला.
भारत सरकारच्या युवा व खेल मंत्रालयाचे क्षेत्रीय संचालक कार्तिकेयन यांनी महाराष्ट्र राज्यातील विविध कोपऱ्यातून आणि विद्यापीठातून आलेल्या सर्व स्वयंसेवक,कार्यक्रमाधिकारी आणि नियोजन कमिटीला सदर कॅम्पच्या यशस्वीतेबद्दल धन्यवाद दिले.एनएसएसच्या महाराष्ट्र विभागाला धन्यवाद देताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावरून रासेयो विभागाची असलेली उद्दिष्टे आणि विविध योजना सर्वांना अवगत केल्या.
शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही.एन.शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनातून या निवड चाचणी शिबिराचा आढावा घेतला.तसेच उणिवासंबंधी ज्या सूचना असतील त्या सूचना देण्याचे आवाहन करताना अजून चांगलं नियोजन करण्याची विद्यापीठाला संधी मागितली.
अध्यक्षीय मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजना विभागाप्रति शाबासकीची थाप व्यक्त करताना सर्वांनी शिवाजी विद्यापीठाच्या नियोजनाची वाहवा केल्याबद्दल प्र-कुलगुरू या नात्याने सर्वांना धन्यवाद दिले.
डॉ.नीलिमा जाधव यांनी शिवाजी विद्यापीठाचे नियोजन हे अतिकृष्ट असल्याचे निरीक्षण नोंदवले.तसेच निरीक्षणात्मक टिपणी करताना डॉ.पवन शिनगारे यांनी शिवाजी विद्यापीठाप्रति आयोजनाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.सोलापूरहून आलेल्या पुष्कर गांधी यांनीदेखील राष्ट्रीय सेवा योजनेच्या आठवणी जागवतानाच शिवाजी विद्यापीठाला धन्यवाद दिले.तसेच नांदेड विद्यापीठाचे कल्याण सावंत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेला धन्यवाद देताना शिवाजी विद्यापीठ एनएसएसमय झाल्याचे निवेदन केले.साक्षी क्षीरसागर व सार्थक पेडणेकर या स्वयंसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी राज्यसंपर्क अधिकारी प्रशांतकुमार वनंजे,क्षेत्रीय संचालक कार्तिकेयन सर,शिवाजी विद्यापीठ प्र-कुलगुरू डॉ.पी. एस.पाटील,कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे,रा.से.यो.संचालक प्रा.अभय जायभाये यांच्यासह सर्व प्रशासकीय,नियोजन समिती विविध विद्यापिठातून आलेले सर्व प्राध्यापक,स्वयंसेवक,तसेच माजी स्वयंसेवक व परीक्षक उपस्थित होते
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 30th Sep 2022 09:44 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 30th Sep 2022 09:44 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 30th Sep 2022 09:44 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 30th Sep 2022 09:44 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 30th Sep 2022 09:44 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 30th Sep 2022 09:44 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 30th Sep 2022 09:44 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 30th Sep 2022 09:44 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 30th Sep 2022 09:44 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 30th Sep 2022 09:44 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 30th Sep 2022 09:44 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 30th Sep 2022 09:44 am













