सातारा, सांगली व कोल्हापूरातून तब्बल 3 लाखाच्या गियरच्या सायकली जप्त

सातारा ; बोरगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करत चोरीस गेलेल्या गियरच्या व इतर प्रकारच्या सायकलींचा छडा लावत तब्बल 2 लाख 92 हजारांचा मुद्देमालासह एका अल्पवयीन मुलगा व त्यानुसार प्रकाश धनाजी जाधव (वय- 50, रा. अपशिंगे, ता. सातारा) व नासिर खलीद खान (वय- 38, रा. वर्णे, ता. सातारा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक सप्टेंबरला खोजेवाडी (ता. सातारा) येथून राजेंद्र जगन्नाथ घोरपडे यांच्या घराच्या पार्किंगमधून 12 हजार रुपये किमतीची सायकल चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बोरगाव पोलिसांत नोंदविली होती. याचा तपास करत असताना सायकल अपशिंगे (मि.) येथील एका अल्पवयीन मुलाने चोरून त्याची विक्री केल्याची माहिती बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना मिळाली. त्यांनी त्वरित गुन्हे शोध पथकाला याबाबत सूचना करत याचा तपास करून शोध घेण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने कारवाई करत अपशिंगे येथून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत त्याच्याबरोबर असणाऱ्या दोघांची नावे सांगितली.

अल्पवयीन मुलाच्या माहितीवरून प्रकाश जाधव व नासिर खान या दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याजवळील एक अॅपे रिक्षा व सातारा शहर परिसरासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून चोरलेल्या 19 सायकलींसह तब्बल 2 लाख 92 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्यासह पोलिस नाईक दादा स्वामी, अमोल सपकाळ, प्रशांत चव्हाण, सुनील कर्णे, अमोल गवळी, पोलिस कॉन्स्टेबल केतन जाधव, विशाल जाधव यांनी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला