विनोद तावडे, पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार?,
Satara News Team
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
- बातमी शेयर करा
मुंबई : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. रिक्त होणाऱ्या ५६ पैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तसेच, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षांकडून पुन्हा या खासदारांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली जाते की इतर कोणाला पाठवले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
राज्यसभेसाठी भाजपकडून विविध नावांची चाचपणी सुरू आहे. राज्यातून भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये भाजपाची पुन्हा सत्ता आणण्यात विनोद तावडे यांचा मोठा हात होता. तर पंकजा मुंडे मागील अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. या निमित्ताने त्यांची नाराजीदेखील दूर करण्याच भाजपचा प्रयत्न असू शकतो. केंद्रीय नेतृत्व लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल
भाजपा : १०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०, काँग्रेस : ४५, शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६ राष्टवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११, बहुजन विकास आघाडी : ३, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ति प्रत्येकी २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ति, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष १३... एकूण २८७
महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ संपतोय
- कुमार केतकर, काँग्रेस
- वंदना चव्हाण, राष्ट्रवादी (शरद पवार गट)
- प्रकाश जावडेकर, भाजप
- मुरलीधरन, भाजप
- नारायण राणे, भाजप
- अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 30th Jan 2024 02:43 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 30th Jan 2024 02:43 pm













