युवतीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ; वारुगड येथील घटना...
Satara News Team
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
- बातमी शेयर करा
आंधळी : खंड्याचीवाडी (वारुगड )येथील राहणारी कु.आकांक्षा चव्हाण हिने राहत्या घरी लोखंडे अँगलला फेटाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी घडली. याबाबतची फिर्याद हनुमंत पोपट चव्हाण वय वर्षे 35 वर्षे व्यवसाय शेती जात हिंदू मराठा रा. खंड्याची वाडी यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सायंकाळी उशिरा याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
वारुगड गावापासून काही अंतरावर असलेली खंड्याची वाडी आकांक्षा आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. ती शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरी एका बंद खोलीत तिने फेट्याच्या साहय्याने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली. दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गळफास घेण्याचे कारण अस्पष्ट असल्यामुळे पुढील तपास दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. रवींद्र खाडे करीत आहेत.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 5th Feb 2024 03:25 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 5th Feb 2024 03:25 pm













