संजय राऊत तुरूंगात गेल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या ड्राईव्हरने वाटले चक्क पेढे
Satara News Team
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
- बातमी शेयर करा
दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले असतानाच दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चालक राहिलेले आणि धुळे जिल्ह्यातील शिवसैनिक प्रकाश राजपुत यांनी संजय राऊत यांना अटक केल्याने चक्क पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे.राऊत यांच्या अटकेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून केंद्रावर हल्लाबोल केला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ड्राईव्हर राहिलेले आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे शिवसैनिक प्रकाश राजपुत यांनी मात्र खासदार संजय राऊत यांना अटक केल्याने आनंद व्यक्त करीत चक्क पेढे वाटले आहेत.१९९३ ते २००० पर्यंत प्रकाश राजपुत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ड्राईव्हर होते.त्यांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना पेढे दिले.संजय राऊत यांना अटक केल्याने मला आनंद झाला असून मी खूष आहे असे यावेळी राजपुत म्हणाले.राऊत यांनी शिवसेना संपली असून,त्यांनी चुकीचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.संजय राऊत तुरूंगात गेल्याने पेढे वाटले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
sanjyaraut
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
संबंधित बातम्या
-
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
-
पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीची ताकद वाढली; शरद लाड, भैय्या माने डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Wed 3rd Aug 2022 01:59 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Wed 3rd Aug 2022 01:59 am












