बोरखळ येथील भैरव देवाची जागेची चोरी ?
सुनिल साबळे- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
- बातमी शेयर करा
शिवथर : बोरखळ ता. सातारा येथील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 220 हे ही खरेदी पत्रानुसार 1952 ते 1995 पर्यंत सदर खुली जागा 42 वर्ष श्री भैरवदेव बोरखळ यांचे नावावर होती सन १९९५ साली भैरव देव यांचे नावावर असलेली जागा बेकायदेशीर कोणतेही कागदपत्र अथवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता मनमानीपणे सत्तेचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतचे नाव करून त्यावर समाज मंदिर बांधून १९९७ साली सिटीसर्वे ला ग्रामपंचायतीने त्याची नोंद केली ग्रामपंचायत नमुना आठ नियम 32 सार्वजनिक समाज मंदिर श्री भैरव देवाशी नोंद करणे ऐवजी ग्रामपंचायतने सत्तेचा दुरुपयोग करून सार्वजनिक समाज मंदिर ग्रामपंचायत अशी केलेली आहे परंतु जुनी कागदपत्र पाहिले असता दस्ताप्रमाणे भैरव देव बोरखळ असे नाव न लागता समाज मंदिर ग्रामपंचायत असे लागल्याने भैरदेवाची जागा चोरीला गेली अशी प्रतिक्रिया रामचंद्र अण्णा रसाळ व राजेंद्र चांगदेव रसाळ यांनी वकिलाच्या माध्यमातून नोटीस मध्ये दिली आहे.
बोरखळ ग्रामपंचायत तिला दिलेल्या वकिलांच्या नोटीस मध्ये नोटीस येणार रामचंद्र आण्णा रसाळ व राजेंद्र चांगदेव रसाळ राहणार बोरखळ यांनी सांगितले वरून सदर मिळकत वामन तात्या रसाळ यांनी 15 3 1952 रोजी भैरवदेव बोरखळ तर्फे पंच आण्णा लक्ष्मण रसाळ व आनंदराव गेनू भांडे यांना खरेदी दिलेली होती खरेदी पत्रानंतर वर नमूद मिळकतीचे रेकॉर्ड सदर देव बोरखळ तर्फे पंच आण्णा लक्ष्मण रसाळ व आनंदराव गेनू भांडे यांचे नावाची नोंद झालेली होती त्यानंतर सदर 28 12 1981 रोजी आण्णा लक्ष्मण रसाळ व आनंदराव गेणू भांडे यांनी सदर मिळकत भैरव देवाचे वहिवाटदार भिकू गणू गुरव यांना खरेदी पत्राने खरेदी दिलेली होती खरेदी पत्रा नंतर वर नमूद मिळकतीचे ग्रामपंचायत बोरखळ तर्फे भिकू गणू गुरव यांचे नावाची नोंद झालेली होती. वर नमूद मिळकतीचा वापर ग्रामस्थ बोरखळ व भैरव देवाचे धार्मिक उत्सवासाठी करत होते.
वरील प्रमाणे परिस्थिती असताना ग्रामपंचायत बोरखळ यांचा वर नमूद मिळकतीशी कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असताना सण १९९५ साली ग्रामपंचायत बोरखळ यांचे पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे सत्तेचा गैरवापर करून वर नमूद मिळकतीचे ग्रामपंचायत रेकॉर्ड सदरील भैरवदेव बोरखळ तर्फे वहिवाटदार भिकू गणू गुरव यांचे नावाची नोंद कमी करून त्या ठिकाणी ग्रामपंचायत बोरखळ यांची नोंद केलेली आहे तसेच या जागेवर ग्रामपंचायतीने सन 1997 साली समाज मंदिर बांधलेले आहे सदर समाज मंदिराची नोंद सिटीसर्वे ला सार्वजनिक समाज मंदिर भैरवदेव बोरखळ अशी करण्याऐवजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून सार्वजनिक समाज मंदिर ग्रामपंचायत बोरखळ अशी केलेली आहे त्यानंतर ग्रामपंचायतीने तारीख 26 1 2023 रोजी ग्रामसभा घेऊन ठराव क्रमांक 18 नुसार वरील नवीन ग्रामपंचायत ची इमारत बांधण्यासाठी समाज मंदिर पाडण्याचे ठरवून तारीख 22 11 2023 रोजी समाज मंदिर पाडलेले आहे त्या ठिकाणी शासकीय निधीतून नवीन ग्रामपंचायत इमारत तसेच शासकीय इमारत बांधण्याचे ठरवलेले आहे त्याप्रमाणे त्याबाबतचे कारवाई सुरू केलेले आहे नोटीसीमध्ये नमूद केलेली मिळकत भैरव देव बोरखळ यांचे मालकीची वहिवाटीची असून त्यांच्याशी ग्रामपंचायत बोरखळ यांचा कोणत्याही प्रकारचा हक्क संबंध नाही केवळ सत्तेचा दुरुपयोग करून अनाधिकाऱाने ग्रामपंचायत बोरखळ यांचे पदाधिकारी व नमूद जागेवर नवीन ग्रामपंचायतचे इमारत बांधकाम करण्याचा प्रयत्न आहे तरी सदर जुने रेकॉर्ड पाहिले असता भैरवदेव बोरखळ या मालकीची जागा असल्याने त्या ठिकाणी इमारत बांधण्यात येऊ नये असे वकिलामार्फत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कळविलेले आहे
याबाबत सध्याचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले सदरची इमारत सद्यपरिस्थितीत सिटीसर्वे ला ग्रामपंचायतीचे मालकीचे असल्याने इतर कोणाचाही अधिकार नाही असे ग्रामस्थांमधून व पदाधिकाऱ्यांमधून बोलले जात आहे
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 22nd Dec 2023 01:29 pm













