अखेर केंद्रीय रस्ते विकास महामंडळा ने वाढे व वडूथ येथील पुलांची केली पाहणी
Satara News Team
- Sat 5th Oct 2024 10:26 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा ते लोणंद रस्त्यावर असलेले वेण्णा नदीवरील वाढे गावाच्या हद्दीत तर कृष्णा नदीवरील वडूथ गावाच्या हद्दीत असलेले तब्बल १७६ वर्षांपूर्वीचे दगडी पूल हे वास्तूशास्त्राचे अलौकिक नमुने आहेत. या दोन्ही पुलावर प्रचंड खड्डे पडले असून त्याचा या पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत बांधकाम विभाग, राजमार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी आणि केंद्रीय रस्ते विकास महामंडळाकडे भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी अर्ज करून याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. अखेर केंद्रीय रस्ते विकास महामंडळा ने वाढे व वडूथ येथील पुलांची केली पाहणी मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही,या खड्ड्यांमुळे अनेक किरकोळ अपघात होत असल्याने अखेर मदन साबळे यांनी हातात टिकाऊ आणि खोरे घेऊन काही धोकादायक खड्डे भरले. मदन साबळे म्हणाले या रस्त्यावरून टोल वाचवण्यासाठी अवजड वाहने जात असल्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत आहे आणि मोठमोठे अपघात देखील होत आहेत आणि झालेले आहेत त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत तरी या रस्त्यावरील अवजड वाहतूक कृपया बंद करावे असे अधिकाऱ्यांना सांगितले
केंद्रीय टिमने केली पाहणी वाढे आणि वडूथ येथील छत्रपती शहाजी महाराजांनी वास्तुशास्त्रातील अनमोल नमुना असणारे दगडी पूल तब्बल १७६ वर्षांपूर्वी बांधले आहेत. यात पुलाची वेळोवेळी योग्य देखभाल, दुरुस्ती न केल्याने आणि मोठी वर्दळ असणारी अवजड वाहतूक या पुलावरून होत असल्याने अस्तित्वाला धक्का बसू लागला आहे. याची थेट तक्रार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रस्ते ऐतिहासिक महामंडळाकडे मदन साबळे यांनी करुन त्याचा पाठपुरावा केला. याची दखल घेऊन या महामंडळाच्या टीमने शुक्रवार दि.४ ऑक्टोबर रोजी दिवसभर दोन्ही पुलांची सखोल पाहणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे,असे अभियंता खताळ यांनी वडूथ,वाढे ग्रामस्थांना सांगितले.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sat 5th Oct 2024 10:26 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sat 5th Oct 2024 10:26 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sat 5th Oct 2024 10:26 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sat 5th Oct 2024 10:26 am
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Sat 5th Oct 2024 10:26 am
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Sat 5th Oct 2024 10:26 am
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Sat 5th Oct 2024 10:26 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sat 5th Oct 2024 10:26 am
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 5th Oct 2024 10:26 am
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 5th Oct 2024 10:26 am
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 5th Oct 2024 10:26 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 5th Oct 2024 10:26 am













