भिलार हील रेंजच्या सौ.तेजस्विनी भिलारे यांना डॉक्टरेट प्रदान ; फ्रान्स येथील विद्यापीठाने दिल्लीत पदवी केली बहाल
Satara News Team
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
- बातमी शेयर करा
भिलार : पुस्तकांचं गाव भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका व कै. एम आर भिलारे हायस्कूल राजपुरीच्या मुख्याध्यापिका सौ.तेजस्विनी जतिन भिलारे यांना फ्रान्स येथील इकोल सुपरियर रोबोर्ट डी सोबर्न विद्यापीठातर्फे नुकतीच डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान समारंभा दरम्यान सौ. भिलारे यांचा खास गौरव करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होतं आहे.
फ्रान्स येथील इकोल सुपरियर रोबोर्ट डी सोबर्न विद्यापीठाने हा पदवीदान समारंभ दिल्ली येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात विद्यापीठाचे चेअरमन थॉमस प्राडे यांचे हस्ते सौ. भिलारे यांनी ही पदवी स्वीकारली. यावेळी व्हाइस चेअरमन विवेक चौधरी, शिशिर अग्रवाल, बोनी कपूर, निरमल बन्सल, कार्तिकेय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. तेजस्विनी भिलारे या महाबळेश्वर तालुक्यात ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाची गंगा पोहचवणाऱ्या कै . बाळासाहेब भिलारे यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनी भिलारे या विविध प्रयोग करून शिक्षण व्यवस्थेत बदल करू पाहत आहेत. तळागाळात शिक्षण पोहोचले पाहिजे यासाठी त्या नेहमी धडपडत असतात. तेजस्विनी भिलारे यांनी ‘ शिक्षण व्यवस्थापन ‘ या विषयावर पी.एच.डी. मिळवली आहे.
या यशाबद्दल डॉ. तेजस्विनी भिलारे यांचे सामजिक , राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 24th Jan 2024 12:12 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 24th Jan 2024 12:12 pm













