रिपब्लिकन सेना कार्यकर्ता संवाद आढावा बैठक व पक्षप्रवेश संपन्न

जिल्हा उपाध्यक्षपदी आयाज शेख यांची निवड

सातारा : रिपब्लिकन सेना कराड तालुक्याची कार्यकर्ता संवाद आढावा बैठक तसेच पक्षप्रवेश कृष्णा पॅलेस या ठिकाणी  तालुकाध्यक्ष हुजेफा मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प. जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांची प्रमुख उपस्थीती होती. 
        यावेळी सामाजिक कार्यकर्ते आयाज शेख यांचा पक्षप्रवेश झाला.त्यांची सर्वानुमते जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदरच्या बैठकीत तालुका व शहर कार्यकारणी बांधणी करून येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका तसेच सामाजिक प्रश्नांवर आंदोलने उभारून पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. यावेळी बोलताना विशाल भोसले यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. आयाज शेख यांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या पक्षाला बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला. ऍड. गायकवाड यांनीही  विविध प्रश्नांच्यावर लक्ष कार्यकर्त्यांनी देण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर देवकांत, पाटण तालुकाध्यक्ष सचिन कांबळे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केली. हुजेफा मुल्ला यांनी सुत्रसंचालन केले.इम्रान शेख यांनी आभार मानले.सदरच्या बैठकीस  मनोज कांबळे ,पठाण,मैनुद्दीन मुल्ला, समीर मुलानी, मधुकर कदम, हनुमंत कदम, अमर देवकांत, हसन मुलानी, सूर्यकांत कदम, आनंदा कदम तसेच कराड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला