बोगदा ते यवतेश्वर - कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीस रविवार आणि सोमवारी पूर्णपणे बंद

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा

सातारा : अतिवृष्टी / भूस्सखलनामुळे सातारा तालुक्यातील सांबरवाडी हद्दीतील सातारा - यवतेश्वर - कास या  घाटातील धोकादायक दरड / दगड कोसळल्यास  मोठया प्रमाणावर जीवीत व वित्त हानी होणेची शक्यता आहे. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत सांबरवाडी येवतेश्वर घाटातील  धोकादायक दरड / दगड फोडण्याची कार्यवाही दि. 24 जुलै रोजी कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग , सातारा यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. तरी रविवार दि. 23जुलै2023 रोजी रात्री 12वाजल्यापासून ते सोमवार दि. 24 जुलै 2023 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत बोगदा ते यवतेश्वर -  कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीस  पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अशी  माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी यांनी दिली आहे.
 तसेच धोकादायक दगड फोडण्याची कार्यवाही सुरु असताना, सदर ठिकाणापासून कमीतकमी 200 ते 300 मीटर परिसरात  कोणी व्यक्ती/पशूधनास  प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. 

कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून महादरे गावाच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामाकरिता, गुरे राखण्याकरिता व इतर कारणासाठी नागरिकांना जाणेस पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.दि. 23जुलै रोजी रात्री १२ वाजलेपासून दि. 24 जुलै रोजीचे रात्री 12 पर्यंत बोगदा ते यवतेश्वर -  कास रस्ता खबरदारीची उपाययोजनेसाठी बंद करणेत येणार असलेने, नागरिकांनी सदर दिवशी पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक करावी असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.                    कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांनी
 सांबरवाडी येवतेश्वर घाटातील  धोकादायक दरड/दगड फोडण्याची कार्यवाही बाबत  सूक्ष्म नियोजन करुन, सुरक्षिततेचे दृष्टीने सर्व प्रकारच्या योग्य त्या खबरदा-या व उपाययोजना कराव्यात, असे निर्देशीत करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला