आज 2 सप्टेंबर शुक्रवार जाणुन घ्या आजचे शुभ अशुभ मुहूर्त आणी राशिभविष्य

आजचा शुभ मुहूर्त ०२ सप्टेंबर २०२२ : ब्रह्म मुहूर्त सकाळी ०४ वाजून २९ मिनिट ते ०५ वाजून १४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून २८ मिनिट ते ०३ वाजून १८ मिनिटांपर्यंत. निशीथ काल मध्यरात्री ११ वाजून ५८ मिनिट ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून २९ मिनिट ते ०६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ दुपारी ०३ वाजून ०८ मिनिट ते ०४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. रवि योग सकाळी ०५ वाजून ५९ मिनिट ते रात्री ११ वाजून ४७ मिनिटांपर्यंत.

शुक्रवार २ सप्टेंबर २०२२, भारतीय सौर ११ भाद्रपद शके १९४४, भाद्रपद शुक्ल षष्ठी दुपारी १-५१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: विशाखा रात्री ११-४७ पर्यंत, चंद्रराशी : तूळ सायं. ५-५५ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनीव, राहूकाळ पूर्वान्ह १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत.

शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०२२
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजच्या दिवशी उत्तम दांपत्य जीवनाचा अनुभव घ्याल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. आपणही जोडीदाराला मनासारखा वेळ द्याल.

वृषभ
आजच्या दिवशी काही शारीरिक, मानसिक अस्थैर्य जाणवेल. आरोग्याच्या अनेक तक्रारी डोके वर काढतील. त्यांच्याकडे मुळेच दुर्लक्ष करून चालणार नाही.

मिथुन
आजचा दिवस उत्साहाचा, आनंदाचा असेल. आपल्यातील कलागुण, आवडीनिवडी, छंद यांना प्रोत्साहन मिळेल. काही नवीन कलाविष्कार सादर कराल.

कर्क
आज उत्तम गृहसौख्याचा आनंद घ्याल. काही धार्मिक व सेवाभावी संस्थांना मदत कराल. ज्येष्ठांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त कराल. यात कुटुंबीयांचेही सहकार्य लाभेल.

सिंह
आज पराक्रमातून लाभ प्राप्तीचा आनंद घ्याल. आपल्यातील क्षमता, योग्यता, पात्रता यांचा योग्य वापर करून व आपल्या मूळ स्वभावाला अनुसरून आजच्या दिवसाचा योग्य वापर करून कार्यसिद्धी कराल.

कन्या
आजचा दिवस हा कौटुंबिक सौख्याचा असेल. कुटुंबीयांच्या इच्छेप्रमाणे वर्तन कराल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी करताना कुटुंबीयांचे मत विचारात घ्या.

तुळ
आजचा दिवस आपल्यासाठी नवीन ऊर्जा व अभूतपूर्व उत्साह यांनी भरलेला असेल. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून आजचा दिवस आनंदात व्यतीत कराल.

वृश्चिक
आजचा दिवस काहीसा तणावयुक्त असेल. काही चिंता आज सतावतील. त्यामुळे आज कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळावेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

धनु
बऱ्याच दिवसांपासून करीत असलेले तपश्चर्या आज कामास येईल. आज लाभाची, आनंदाची प्राप्ती कराल. मात्र जे मिळालं ते योग्य पद्धतीने जपून ठेवा. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.

मकर
आज आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित राहील. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले काही काम पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्नशील राहाल.

कुंभ
आज भाग्याची, नशिबाची साथ आपणास मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे, परिश्रमाचे आज चीज होईल.

मीन
आजच्या दिवशी अनेक अडचणी व अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्याही काही समस्या सतावतील. आज केवळ आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करावे.

 

आजचा अशुभ मुहूर्त ०२ सप्टेंबर २०२२ :

राहूकाळ दुपारी १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ०३ वाजून ३० मिनिट ते ०४ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. सकाळी ०७ वाजून ३० मिनिट ते ०९ वाजेपर्यंत गुलिक काळ असेल. दुर्मुहूर्त काळ सकाळी ०८ वाजून ३२ मिनिट ते ०९ वाजून २३ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ४६ मिनिट ते ०१ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असेल.

   सौ . कांचन थिटे 
ज्योतिष, अंक वास्तू शास्त्र प्रवीण, विवाह (m.s)

ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध 
 संपर्क  :  9657836393 
तडवळे रोड, नवीन s.t. स्टँड जवळ, कोरेगाव, सातारा

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला