साताऱ्यात पाच लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Satara News Team
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
- बातमी शेयर करा
फलटण ; मुंजवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मोरे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलिसांचे एक पथक तयार करून मिळालेल्या माहितीनुसार प्राप्त ठिकाणी सापळा लावून बसले तेव्हा संशयित आरोपी हा युनिकॉन मोटरसायकल वरून मुंजवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा गावातील माध्यमिक शाळेजवळ अमली पदार्थाचे म्हणजेच गांजाची विक्री करण्यासाठी आला होता संशयित इसमास सापळा लावून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील पाच लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा तसेच एक लाख रुपये किमतीचे दोन मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखा त्यांनी ताब्यात घेतले त्याच्या विरुध्द फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गु.र.नं. १३५४/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २०(ब) (ii) (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
या कामगिरीत सहभागी झालेलायचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, अमित माने, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, स्वप्नील दौंड, वैभव सावंत, संभाजी साळुंखे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 4th Jul 2023 04:27 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Tue 4th Jul 2023 04:27 pm













