स्वतःचा व्यवसाय सांभाळून समाजकारण करावे : श्रीमंत. छ. आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले
जीवन मोहिते
- Tue 20th Sep 2022 09:33 am
- बातमी शेयर करा
सातारा : मानव हा समाजशील प्राणी आहे.त्यामुळे स्वत:चा व्यवसाय-नोकरी सांभाळुन राजकारण,समाजकारण आदी आवडीच्या क्षेत्रात कार्यरत रहावे. असे आवाहन श्रीमंत छ. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. माळ्याची वाडी,ता.सातारा येथे हॉटेल गावकारीचा उदघाटन सोहळा छ. आ.भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला.तेव्हा ते उद्घाटनपर मार्गदशन करीत होते. छ.आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, "युवकांनी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर धरसोडवृत्ती टिकत नाही.तेव्हा कायम निष्ठा असेल तर यश मिळण्यास साह्य होते.हॉटेल व्यवसायात स्वतःची खास अशी ओळख निर्माण करावी.जवळच असणाऱ्या जलसागरचा आदर्श घ्यावा.मेणकर-यादव यांनी केलेली पार्टरशीप नक्कीच खवय्याना खेचून घेण्यात यशस्वी होईल.सध्या हॉटेलमध्ये स्पर्धा असल्याने स्वतःचा पॅटर्न व चविष्ट जेवण दिले तर नक्कीच उत्तरोत्तर व्यवसायाची वाढ होईल."धर्मराज घोरपडे म्हणाले, "निसर्गरम्य ठिकाण असल्याने हॉटेलला लाभ मिळेल.मात्र, त्रिकुटानी ग्राहकांना सेवा कायमस्वरूपी देण्यासाठी पूर्णवेळ उपलब्ध असले पाहिजे." शहारालगतच गावकारीचा स्वाद घेण्यासाठी सातारा व महाबळेश्वर रस्त्यास ये-जा करणाऱ्यांची पावले आपोआप वळतील.मात्र,दर्जा उत्कृष्टच असला पाहिजे.या अर्थाने अनेकांनी मार्गदर्शन केले. हॉटेल गावकारीचे प्रो.प्रा. इंजि. धनंजय यादव,अमोल मेणकर व विश्वनाथ यादव यांनी स्वागत करून मान्यवरांचा सत्कार केला.संभाजी इंदलकर यांनी प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास विक्की वाघमळे, मोहन शिर्के,विशाल साळुंखे, सचिन पालवे,सागर पवार, अविनाश कदम,दिनकर कदम, संभाजी इंदलकर, जीतेंद्र सावंत व हणमंत सावंत (लिंब),राहुल काळे,क.अभियंता आशिष देशपांडे,दिलीप निंबाळकर, बाळासाहेब इंदलकर, चैतन्य, गणेश निंबाळकर, प्रवीण मस्के, विजय इंदलकर,महाबळेश्वर तालुका विकास संस्थेचे समन्वयक रखमाजी यादव, विलास यादव,रवींद्र भालेराव, एन. नवनाथ,जे.छाया,नामदेव इंदलकर,दीपक,के.चव्हाण,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर संतोष भोसले,संतोष इंदलकर, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
#satara
#shivendraraje
#ajikyatara#shivendrarajebhosale
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Tue 20th Sep 2022 09:33 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Tue 20th Sep 2022 09:33 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Tue 20th Sep 2022 09:33 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Tue 20th Sep 2022 09:33 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Tue 20th Sep 2022 09:33 am
संबंधित बातम्या
-
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Tue 20th Sep 2022 09:33 am
-
पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीची ताकद वाढली; शरद लाड, भैय्या माने डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय
- Tue 20th Sep 2022 09:33 am
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Tue 20th Sep 2022 09:33 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 20th Sep 2022 09:33 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Tue 20th Sep 2022 09:33 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Tue 20th Sep 2022 09:33 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Tue 20th Sep 2022 09:33 am












