सातारा रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा ‘लूक’
ओम सोनावले
- Wed 28th Sep 2022 05:59 am
- बातमी शेयर करा
रेल्वे प्रशासनाच्या समितीने संगम माहुली, क्षेत्र माहुली, किल्ले सज्जनगड, किल्ले अजिंक्यतारा, ऐतिहासिक राजवाडा, जलमंदिराची पाहणी केली होती. समितीच्या या पाहणीनंतर सातारा रेल्वे स्थानकावर नव्याने मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे
सातारा : सातार्याचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्रवाशांना कळावे. पर्यटकांमध्ये वाढ व्हावी. या उद्देशासाठी रेल्वे प्रशासनाने अनोखे पाऊल उचलले आहे. सातारा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराला संगम माहुली व क्षेत्र माहुली, सज्जनगड, अजिंक्यतारा, राजवाडा व जलमंदिर या ऐतिहासिक वास्तूंचा लूक दिला जात आहे. त्यामुळे सातारा रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होत आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे-सातारा मार्गात जेजुरी स्थानकाला तेथील देवस्थानामुळे महत्त्व आले आहे. या रेल्वे स्थानकाला मल्हार गडाचा लूक देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सातारा रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक गड किल्ल्यांचा लूक देण्याचा प्रयत्न मध्यरेल्वे मार्फत सुरू आहे. सातारा जिल्ह्याला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. गड, किल्ले, ऐतिहासिक व हेरिटेज वास्तू, जागतिक वारसा स्थळ असलेले कास पुष्प पठार यामुळे जिल्ह्याची ओळख देशासह परदेशात पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात सातारा रेल्वे स्थानकात जिल्ह्यातील वन्य प्राणी व कास पुष्प पठारावरील विविध रंगी फुलांची चित्रे रेखाटण्यात आली होती. त्यानंतर आता ऐतिहासिक गड किल्ल्यांचा लूक देण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाने हाती घेतले आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या समितीने संगम माहुली, क्षेत्र माहुली, किल्ले सज्जनगड, किल्ले अजिंक्यतारा, ऐतिहासिक राजवाडा, जलमंदिराची पाहणी केली होती. समितीच्या या पाहणीनंतर सातारा रेल्वे स्थानकावर नव्याने मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणी संगम माहुली, क्षेत्र माहुली, किल्ले सज्जनगड, किल्ले अजिंक्यतारा, ऐतिहासिक राजवाडा, जलमंदिरमधील विविध ऐतिहासिक गोष्टींचा काही भाग साकारण्यात आला आहे. आकर्षक प्रवेशद्वार, कोरीव व नक्षीकाम असलेले खांब, गोलाकार घुमटामुळे रेल्वे स्थानकाला किल्ल्याचा लूक आला आहे. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम 2 ते 3 महिन्यांत पूर्ण होणार आहे. सातारा रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक गड व किल्ल्यांचा लूक देण्यात येत असल्याने स्थानक कात टाकू लागले आहे. या ऐतिहासिक लूकमुळे बाहेरील पर्यटकांनाही सातार्याची महती कळणार आहे. सध्या पुणे ते मिरज लोहमार्ग दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेची संख्या वाढणार आहे. तसेच सातारा रेल्वे स्थानकात रेल्वे विविध कार्यालयांच्या इमारती उभारणीचे कामही सुरू आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 28th Sep 2022 05:59 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 28th Sep 2022 05:59 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 28th Sep 2022 05:59 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 28th Sep 2022 05:59 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 28th Sep 2022 05:59 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 28th Sep 2022 05:59 am
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 28th Sep 2022 05:59 am
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Wed 28th Sep 2022 05:59 am
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Wed 28th Sep 2022 05:59 am
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 28th Sep 2022 05:59 am
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Wed 28th Sep 2022 05:59 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Wed 28th Sep 2022 05:59 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 28th Sep 2022 05:59 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Wed 28th Sep 2022 05:59 am











