उडतारे येथील जवान प्रवीण बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बापू वाघ - Thu 5th Dec 2024 08:50 pm
- बातमी शेयर करा
वाई ; उडतरे ता वाई येथील भारतीय सैन्य दलातील जवान प्रवीण रमेश बाबर यांचा आसाम गुवाहाटी येथे सेवा बजावत असताना गोळी लागून वीर मरण आले त्याच्यावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
शहीद जवान प्रवीण बाबर सैन्य दलातील ई कमांडो फोर्स मध्ये होते त्यांचे वडील यांनी देखील सैन्य दलात सेवा केली होती, प्रवीण बाबर हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांचे गुवाहाटी आसाम याठिकाणी सेवा बजावत असताना गोळी लागून वीर मरण बुधवारी पहाटे आले, त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी उडतारे या त्यांच्या मूळ गावी सकाळी आठ वाजता आणण्यात आले यावेळी गावातून त्यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या गाडीतून अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी शहीद जवान प्रवीण बाबर अमर रहे भारत माता कि जय या घोषणा देण्यात आल्या
यावेळी राज्यसभा खासदार नितीन पाटील किसनवीर कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम तहसीलदार सोनाली मेटकरी भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
सातारा पोलीस दलाच्या वतीने मानवंदना गोळ्यांच्या फैरी झाडून देण्यात आली,
त्यांच्या पश्चात वृद्ध आई,पत्नी,दोन मुली एक मुलगा एक भाऊ असा मोठा परिवार असून
शहीद जवान प्रवीण बाबर यांच्या लग्नाचा वाढदिवस मंगळवारी होता आणि बुधवारी त्याच्या निधनाची बातमी समजल्यावर सर्व उडतारे गावाला मोठा धक्का बसला होता यामुळे संपूर्ण वाई तालुक्यात मोठी हळहळल व्यक्त होत आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 5th Dec 2024 08:50 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 5th Dec 2024 08:50 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 5th Dec 2024 08:50 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 5th Dec 2024 08:50 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 5th Dec 2024 08:50 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 5th Dec 2024 08:50 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Thu 5th Dec 2024 08:50 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Thu 5th Dec 2024 08:50 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 5th Dec 2024 08:50 pm













