बुरखा घालून आलेल्या युवकाला मारहाण तामजाईनगरमध्ये आला होता मैत्रिणीला भेटायला,

मुले पळवायला आल्याच्या संशयातून बदडले,

सातारा  : दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करंजे येथील तामजाईनगरमध्ये एक युवक बुरखा घालून आला होता. तो शाळेचे नाव विचारात होता. यावेळी तेथील एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याला पकडले. यावेळी बुरख्यात युवक असल्याचे लक्षात येताच हा मुले पळवायला आला की काय, अशा संशयाने त्याला मारहाण करण्यात आली. तोच शाहूपुरी पोलिसांना फोन करून युवकाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच तो मैत्रिणीला भेटायला आल्याचे सांगितले.  
  तामजाईनगरमध्ये शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक युवक बुरखा घालून आपल्या मैत्रिणीला भेटायला आला होता. तिच्या घरचा पत्ता माहिती नसल्याने तो शाळा कुठे आहे. अशी हिंदी भाषेतून विचारणा करू लागला. बुरख्यातून पुरूषाचा आवाज येत असल्याने दुकानदाराला संशय आला. त्याने युवकाला उलटसुलट प्रश्न विचारले, युवकाला पकडून ठेवले. यामुळे हा युवक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. दुकानदाराच्या ही बाब लक्षात येताच त्याने आरडाओरडा करत इतर लोकांना बोलवले. लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बघता बघता परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. यातील एकाने शाहूपुरी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि युवकाला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात नेऊन खाक्या दाखवताच तो घडाघडा बोलू लागला. तो मैत्रिणीला भेटायला आला होता. तिच्या घरी हे मान्य नसल्याने तो बुरखा घालून आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीसांनी त्याच्याकडून चांगल्या वर्तनुकीचा बॉन्ड भरून घेतला.  

मुले पळविणारी टोळीची अफवाच  
शहरात मुले पळविणारी टोळी आली आहे. ही अफवा प्रत्येकांच्या मनात आहे. यामुळे घटना घडली की, त्याला टोळी आली हेच नाव दिले जात आहे. परंतु घटनेमागचे वास्तव वेगळे असते. ही बाब आता सगळयांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि मुले पळविणाऱया अफवांना बळी पडू नका असे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनीही केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला