शासकीय गायरान जमीन वरील अतिक्रमण बचाओ संघर्ष मोर्चाची स्थापना करणार !

सातारा : शासकीय गायरान जमीन वरील अतिक्रमण बचाओ संघर्ष मोर्चाची स्थापना करणार आहे.अशी माहिती रिपाई राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली.
      महाराष्ट्रासह जिल्हा - सातारा तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबईसह अनेक ठिकाणी शासकीय गायरान जमिनीवरती अनेक प्रकारचे अतिक्रमण अर्थात,ज्यांना जमीन नाही असे रहिवासी राहत आहेत.जमीन कसत आहेत/लागवड करत आहेत/छोटी-मोठी दुकान टाकलेली आहेत. व्यवसाय करत आहेत.अशा अनेक प्रकारचे अतिक्रमण काढण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश झाला आहे. तो निर्णय अत्यंत चुकीचा आहे. गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात निवासी, वाणिज्य, औद्योगिक,शेती व अन्य प्रयोजनासाठी नागरिकांनी अतिक्रमण केलेली आहे. ते अतिक्रमण हे भारताचे नागरिक म्हणून त्यांनी आपल्या व्यवसायासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी करत आहेत. पण सदर अतिक्रमण काढण्याचा जो आदेश झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये पुनश्च आपले मूल्य मांडून हे अतिक्रमण हटवण्याच्या आदेशावर स्थगिती आणावी.अन्यथा, अतिक्रमणे बचाव संघर्ष समितीची स्थापना करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली. राज्य शासनाने त्वरित न्यायालयामध्ये जाऊन याबाबत आपले म्हणणे मांडून संबंधित आदेशाच्या विरोधात स्थगिती घ्यावी. अन्यथा,येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्यावतीने गायरान जमिनीवरील अतिक्रमण वाचवण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात येईल. सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी जर मूलभूत अधिकाऱ्यांच्यावर कुणी गदा आणण्याचा प्रयत्न करत असेल व सर्वसामान्यांना  संसार आयुष्य धुळीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन यामध्ये सामील व्हावे. एकंदर छोटे-मोठे तीन लाखाची आसपास ही अतिक्रमणे आहेत. त्यामुळे यावरती अनेक कुटुंबे निर्वाह करत असल्यामुळे याबाबत रिपब्लिकन पक्ष आक्रमक रित्या भूमिका घेत आहे. लवकरच याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाच्यावतीने देण्यात आला.न्यायासाठी सर्व समविचारी संघटना-पक्षांना एकत्र घेऊन एक जन आंदोलन उभा करू. असाही  इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी पदाधिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला