निलेश मोरे यांची शिवसेना शहराध्यक्षपदी निवड
शहरात संघटनात्मक बांधणीची मोठी जवाबदारीSatara News Team
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
- बातमी शेयर करा
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यातील पहिले कट्टर समर्थक निलेश मोरे यांची शिंदे प्रणित शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे . या निवडीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे तसेच जिल्हा संपर्क समन्वयक शरद कणसे यांनी अभिनंदन केले आहे साताऱ्यात मोबाईल व्यवसाय क्षेत्रांमध्ये भक्कमपणे पाय रोवणाऱ्या निलेश मोरे यांची राजकीय वाटचाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्कम पणे सुरु आहे शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी निलेश मोरे यांनी शिंदे यांच्या पाठिंब्याने सातारा शहर आणि परिसरातील अनेक प्रश्न मार्गी लावले मग तो शाहू स्टेडियम मधील सिंथेटिक ट्रॅक चा प्रश्न असो किंवा सातारा शहरातील जलतरण तलावाच्या सक्षमीकरणाच्या प्रस्तावाचा या दोन्ही उपक्रमांना निलेश मोरे यांच्या माध्यमातून भरघोस निधी मिळाला साताऱ्यात कोणतीही सत्ता नसताना केवळ जनसंपर्क आणि सकारात्मक काम करण्याची धडपड यामुळे निलेश मोरे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये चांगले कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले आहे शिंदे गटाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून तयारी सुरू झाली आहे या बांधणीसाठी फार मोठी जबाबदारी निलेश मोरे यांच्या खांद्यावर आली असून संघटनात्मक कार्य त्यांना बळ मिळावे म्हणून सातारा शहराचे संघटन बांधणी आणि कार्यक्षेत्र मोरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या भक्कम मार्गदर्शनाखाली संघटनेची बांधणी करताना पक्षाची ध्येय धोरणे आणि विकास कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी आमचा अग्रक्रम राहील अशी प्रतिक्रिया निलेश मोरे यांनी दिली आहे
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
संबंधित बातम्या
-
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
-
पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीची ताकद वाढली; शरद लाड, भैय्या माने डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sun 21st Aug 2022 12:19 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sun 21st Aug 2022 12:19 pm












