ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा व राज्याचा विकास --- पालकमंत्री शंभूराज देसाई
कोमल वाघ पवार
- Sat 5th Nov 2022 05:54 am
- बातमी शेयर करा
सातारा: खेडी सुधारली, ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा आणि राज्याचा विकास होतो असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील शिंदेवाडी ते कुसरुंडी या राज्य अर्थसंकल्पीय तरतूदीतील रस्त्याचे आज भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदू, निर्मला देसाई, माजी पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, प्रांताधिकारी सुनील गाडे, गट विकास अधिकारी श्री. शेलार, कार्यकारी अभियंता व्ही. शिंदे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
परतीच्या पावसामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम लांबल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, गावातील रस्ते, साकव, संरक्षण भिंती अशा विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. डोंगरात वसलेल्या गावांपर्यंत विकास पोहचत आहे. ग्रामीण जनतेपर्यंत रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मूलभूत सोयी पुरवणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी असल्याचेही ते या वेळी म्हणाले.
येत्या तीन दिवसात ५८ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन होत असल्याचे सांगून श्री देसाई पुढे म्हणाले, विकासाचे एक रोल मॉडेल म्हणून पाटण तालुक्याचा विकास करूया. त्यासाठी नागरिक माझ्यासोबत राहतील आणि साथ देतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिंदेवाडी, कुसरुंड, सुळेवाडी, पाटील वस्ती येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 5th Nov 2022 05:54 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 5th Nov 2022 05:54 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 5th Nov 2022 05:54 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 5th Nov 2022 05:54 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 5th Nov 2022 05:54 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Nov 2022 05:54 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Nov 2022 05:54 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 5th Nov 2022 05:54 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 5th Nov 2022 05:54 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 5th Nov 2022 05:54 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 5th Nov 2022 05:54 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 5th Nov 2022 05:54 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 5th Nov 2022 05:54 am













