ग्रामस्थांनी केलेला सन्मान लाखमोलाचा - हिंदूराव कदम
निसार शिकलगार - Tue 27th Jun 2023 03:49 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव: संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत खटाव तालुक्यातील भुरकवडी गावचे सुपुत्र हिंदूराव पांडूरंग कदम बापू यांची बहूमताने निवड झाल्याबददल त्यांचा येरळा परिवार वडूज, ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी भुरकवडी व ग्रामस्थांच्यावतीने खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीपदादा मांडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच शिवाजीराव कदम आबा, कार्यकारी सरपंच छगन कदम, सोसायटीचे चेअरमन दिलीप कदम, शरदराव कदम, शिवकृपा पतपेढीचे वारणा शाखाधिकारी अनिल फडतरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अविनाश कदम, सुनिल कदम, बबन कदम, शामराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना हिंदूराव कदम बापू म्हणाले की निवडणूक पार पडल्यानंतर संचालक म्हणून अनेक ठिकाणी आमच्या सत्काराचे कार्यक्रम पार पडत आहेत पंरतु गावाच्या ग्रामस्थांनी केलेला सत्कार हा माझ्यासाठी लाखमोलाचा असून या संचालकपदाच्या आणि संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न घेऊन पुढे वाटचाल करणार आहे व खटाव तालुक्यातील मतदारांनी केलेल्या सहकार्यातून उतराई होणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी संदीप मांडवे म्हणाले की शिवकृपा पतपेढी ही महाराष्ट्रात १ नंबरची संस्था असून या संस्थेवर भुरकवडीसारख्या छोट्या गावातील एक सामान्य नागरिक या संस्थेवर बहूमतांने निवडून जावून संचालक झाला ही कौतुकाची बाब आहे. बापूंनी या संचालकपदाच्या माध्यम्यातून तालुक्यातील संस्थेच्या सभासदांसाठी हितकारक निर्णय घ्यावेत. तर बापूंचे बंधू शामराव कदम म्हणाले की या निवडणुकीत सभासद बांधवांनी आम्हा सर्वांवर विश्वास ठेवून मोठे मताधिक्य देत शिवकृपा पतपेढीत आपण व आपल्या सर्व सहकाऱ्यांनी आज पर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती दिली आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर दाखविलेल्या विश्वासास आम्ही सर्वजण निश्चितच पात्र राहू. या दिलेल्या संधीबददल सभासद, ठेवीदार, कर्जदार,सेवक वर्ग व हितचिंतक या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. बबन कदम, प्रभाकर कदम यांचीही शुभेच्छापर मनोगते झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार प्रविण कदम यांनी मानले. यावेळी दादासो पाटील, जालींदर कदम, सयाजी कदम, प्रशांत गाडे, दशरथ कदम, उत्तम कदम, शिवाजी कदम, चंद्रकांत कदम, मंगेश लावंड, महेंद्र कदम, मंगेश कदम, अमोल कदम, नितिन कदम, अनिल कदम, शहाजी कदम, नामदेव कदम, संतोष जाधव, संजय कदम, हणमंत गाढवे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 27th Jun 2023 03:49 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 27th Jun 2023 03:49 pm













