विकास सोसायटी हीच शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आ. शिवेंद्रसिंहराजे; अंगापूर सोसायटीच्या विस्तारित इमारतीचे उदघाटन

सातारा:  ग्रामीण पातळीवर विकास सेवा सोसायट्यांचे कार्य खूपच मोलाचे आहे. शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातूनच अर्थ सहाय्य मिळत असते. सातारा तालुक्यात सर्वच विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली जात आहे. विकास सेवा सोसायटी हीच शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

अंगापूर वंदन ता. सातारा येथे गावच्या विकास सेवा सोसायटीच्या नूतन विस्तारित इमारतीचे उदघाटन आणि विघ्नहर्ता विकास सेवा सोसायटीचे नूतन वास्तूमध्ये स्थलांतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी आ. शिवेंद्सिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, जेष्ठ नेते रामभाऊ जगदाळे, दिलीपनाना फडतरे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष धंनजय शेडगे, अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक विश्वास शेडगे, माजी संचालक विनायक बर्गे, जयसिंग कणसे, हणमंतराव कणसे, सोसायटीचे चेअरमन दिनकर कणसे, व्हा. चेअरमन अंकुश कणसे, सरपंच नीलम कणसे, पोपटराव कणसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या माध्यमातून सातारा तालुक्यात सहकार चळवळ रुजली. आज विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष प्रत्येक गावात पाहायला मिळत आहे. काही अपवाद वगळता सातारा तालुक्यात विकास सोसायट्यांचे कार्य उल्लेखनीय आणि आदर्शवत आहे. यामध्ये अंगापूर सोसायटीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. निवडणुकीपुरते राजकारण करून सोसायट्यांच्या माध्यमातून सर्वच सभासद, शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

किशोर कणसे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम कणसे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास सोसायटीचे आजी, माजी संचालक, सर्व पदाधिकारी, सभासद, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला