सायबर फ्रॉड मध्ये गेलेले 88000/- रुपये पोलीसांच्या प्रयत्नामुळे व्यापाऱ्यास परत

कराड शहर पोलीसांची सातत्यपुर्ण कामगिरी

दि.28/10/2022 रोजी सायंकाळी 06.00 वा. सुमारास कराड येथील प्रसिद्ध व्यापारी यांचा सायबर फ्रॉड हेावून त्यांचे खात्यातील रुपये 88000/- रुपये कट झालेले हेाते. त्यांनी तात्काळ कराड शहर पोलीस ठाणेस संपर्क केला. त्यांचेकडून माहिती घेतली असता त्यांनी घर घेणेसाठी कर्ज घेतलेले पैसे खात्यावर होते. त्यातील रक्कम रुपये 88000/- रुपये कट झालेले आहेत. असे घाबरत सांगितले. 
 सपोनि अमित बाबर व पोलीस नाईक संजय जाधव यांनी व्यापाऱ्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. नमुद माहितीच्या आधारे सायबर पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक अमित झेंडे व अजय जाधव यांना संपर्क करून तात्काळ कारवाई करण्यास कळविले. त्याप्रमाणेे सायबर पोलीस ठाणे सातारा व कराड शहर पोलीस ठाणेकडील सर्तक पोलिसिंगमुळे सायबर फ्रॉड होवून व्यापाऱ्याचे गेलेले 88000/- रुपये दि.29/10/2022 रोजी मिळाले आहेत. पोलीसांनी केलेल्या कारवाई बाबत व्यापाऱ्याने पोलीसांचे आभार माणून खरी दिवाळी भेट पोलीसांचे मदतीतून मिळाल्याचे सांगितले. सायबर क्राईम बाबत नागरीकांनी जागरुक राहणे बाबत पोलीसांनी आवाहन केले आहे. कारण जागृकता हाच एकमेव प्रतिबंधक उपाय आहे.  
नमुदची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित बोऱ्हाडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बी.आर.पाटील व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर, पोलीस हवालदार संजय जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमित झेंडे व अजय जाधव यांनी केलेली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला