रंगात पडला भंग दोन गटात तुफान राडा
Satara News Team
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
- बातमी शेयर करा
सातारा : क्रांतिस्मृती मैदान येथे रंगोत्सव कार्यक्रमात दोन गटात राडा झाला. दगड, दांडके याने मारहाण करत एकाने कोयता दाखवत दहशत माजवली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी हा कार्यक्रम बंद पाडला. शनिवारी रंगपंचमी असल्याने शहरात ठिकठिकाणी रंगोत्सव किंवा रंग बरसे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉल्बीचा आवाज, पाण्याचे फवारे आणि रंग यातून तरुणाई चिंब झाली. शुक्रवार पेठेतील क्रांती स्मृती मैदान येथे काही तरुणांनी रंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी याठिकाणी मुली नाचणार्या बाजूस तरुणांचा एक ग्रुप आला. त्यावेळी नाचताना त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर एकजण कोयता घेऊन येत काहीकाळ नाचवत नंतर तेथून गायब झाला. मात्र, त्यानंतर दगड व लाकडी दांडक्याने मुलांच्या दोन गटात राडा झाला. त्याठिकाणी असणार्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. यानंतर शाहूपुरी पोलिसाना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हा कार्यक्रम बंद पाडला. यानंतर पोलिसांनी संबंधितांचा व्हिडीओच्या माध्यमातून शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, माळवाडी रस्त्यावरही रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने याठिकाणी दोन तास वाहतूक खोळंबली होती. डॉल्बीचा दणदणाट केल्याने नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी हाही कार्यक्रम बंद पडून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sat 30th Mar 2024 10:49 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Sat 30th Mar 2024 10:49 pm











