फलटण शहर पोलीस स्टेशन येथे व्यावसायिकांच्या समवेत पोलीस प्रशासनाची बैठक
राजेंद्र बोंद्रे (सातारा न्यूज)
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
- बातमी शेयर करा
फलटण: दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजता फलटण पोलीस प्रशासनाच्या वतीने फलटण शहरातील समस्या आणि त्यावर उपाययोजना आणि खबरदारी यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने संध्याकाळी सात वाजता फलटण शहरातील व्यवसायिकांच्या समवेत फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री यशवंत नलावडे यांनी मार्गदर्शनपर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील चोरी, वाहतूक समस्या ,तसेच गुन्हा घडून ये म्हणून व्यवसायिकांनी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन श्री यशवंत नलावडे पोलीस अधिकारी फलटण शहर यांनी केले. या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री नलवडे साहेब यांनी सांगितले की आपण ज्यावेळी बाहेरगावी जात असतो त्यावेळी आजूबाजूच्या शेजाऱ्यांना त्याची कल्पना देण्यात यावी तसेच घरामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये उदाहरणार्थ गॅस स्फोट वगैरे अशा गोष्टी टाळण्यासाठी किंवा काही महत्त्वाची गोष्ट आपणास लागल्यास त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्या घराची चावी शेजारी असणे आवश्यक आहे तसेच गृहनिर्माण सोसायटीमध्ये कोणी भाडे करू ठेवताना त्या भाडेकरूची अत्यावश्यक असणारी कागदपत्रे भाडेकरार आणि त्याची संपूर्ण माहिती सोसायटी आणि पोलीस स्टेशनला देण्यात यावी. सध्या मीडियाद्वारे ऑनलाइन गुन्हे होण्याची संख्या वाढत आहे त्या दृष्टीने कोणत्याही अश्लील मेसेज आले .
अनोळखी लिंक आल्या तर त्यापासून सावधान राहावे तसेच कोणत्याही प्रलोभानाला खोटे आश्वासनाला नागरिकांनी बळी पडू नये.
तसेच वाहतुकीची समस्या आणि पार्किंग व्यवस्था बाबत सर्वच नागरिकांनी दुसऱ्यांना गैरसोयीचे होईल असे कोणतेही कृत्य न करता त्याचे पालन करावे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही सदैव आपल्या समस्यासाठी तत्पर असून आपण निसंकोचपणे आपल्या तक्रारी समस्या बाबत आम्हाला कल्पना देण्यात यावी तसेच शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी फलटण शहरातील सर्वच व्यावसायिक आणि नागरिकांनी कोणतीही सामाजिक तेढ निर्माण होईल सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, जातीय तेढ निर्माण होईल असे वर्तन करू नये याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी. फलटण शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे या शहरांमध्ये शांतता ,ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य, तालुक्यातील आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या शिक्षणासाठी मुली तसेच विद्यार्थी या सर्वांना त्यांच्या अडीअडचणीसाठी सहकार्य करावे.
फलटण बस स्थानकात फलटण तालुक्यातील आजूबाजूच्या खेड्यातून शिक्षणासाठी ये,जा करणाऱ्या विद्यार्थिनी, विद्यार्थी, यांच्या अडीअडचणीसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सर्वांनी तत्परता बाळगावी आणि आपल्या शहरात शांतता प्रस्थापित करण्यात यावी . तसेच फलटण शहरांमध्ये वारंवार महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी च्या घटना भर रस्त्यात घडत आहेत अशा गुन्ह्यातील आरोपींचा शोध लावण्यासाठी व या घटना पुन्हा घडू नयेत याच्या खबरदारीसाठी रस्त्यावर जर घटना घडत असेल तर त्या महिलेला सहकार्य करावे आणि त्या वाहनाचा नंबर घेण्याचा प्रयत्न करावा ,तसेच आजूबाजूच्या व्यवसायिकांनी सतर्कतेने त्या वाहनाचे फोटो काढून आम्हास गुन्हाच्या शोधासाठी सहकार्य करावे अशी विनंती ही त्यांनी सर्व व्यवसायिकांना केलीआपल्या अडीअडचणीसाठी फलटण शहर पोलीस स्टेशन सदैव आपल्या मदतीस तत्पर आहे असे असेही त्यांनी नमूद केले.
#phaltan
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 19th Dec 2024 12:53 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Thu 19th Dec 2024 12:53 pm











